MP Sandipan Bhumre : शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवा

खा. संदीपान भुमरे यांचे आवाहन, कन्नडमध्ये दुष्काळ निवारण आढावा बैठक
MP Sandipan Bhumre
MP Sandipan Bhumre : शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवाfile photo
Published on: 
Updated on: 

Resolve farmers' issues on a priority basis

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुष्काळ परिस्थितीत शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या प्राधान्याने सोडवून त्यांना दिलासा द्यावा, असे प्रतिपादन खासदार संदीपान भुमरे यांनी केले.

MP Sandipan Bhumre
Sambhajinagar News : विकसित छत्रपती संभाजीनगर २०४७ साठी मनपाची 'मित्र' सोबत भागीदारी

तहसील कार्यालयात खासदार संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार संजना जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दुष्काळ निवारण आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले.

बैठकीत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान, नुकसानभरपाई, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीकविमा योजनेची अंमलबजावणी, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा, रोजगाराच्या संधी तसेच विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला. शेतकरी आणि ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना खासदार भुमरे यांनी दिल्या.

MP Sandipan Bhumre
Gangapur News : वीज उपकेंद्राची क्षमता दुप्पट

दरम्यान, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले. संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

या बैठकीस आमदार संजना जाधव, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, पंचायत समितीच्या सभापती प्रिया घुगे, नगराध्यक्षा फरीन बेगम अब्दुल जावेद, भाजप तालुकाध्यक्ष किशोर आबा पवार, देवगाव जिल्हा परिषद डॉ. संजय गव्हाणे, तहसीलदार सारिका भगत, खरेदी विक्री संघाचे सभापती ज्ञानेश्वर निकम, कृउबा उपसभापती जयेश बोरसे, पं.स. सदस्य सिद्धेश्वर झाल्टे यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वीज खंडित करू नका : पवार

तालुक्यातील धरणातुन थेट पाणी उपसा होत असेल बंद करण्यास हरकत नाही मात्र शेतकऱ्यांच्या मालकी हक्क असलेल्या विहिरीचा वीज पुरवठा खंडित करू नका. शेतकरी हे शेत वस्तीवर राहत असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास त्यांचा व त्यांच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ज्या गावात पाण्याच्या टँकर ची मागणी असेल त्या ठिकाणी टँकर सुरु करण्यात यावे, काही गावाला पाणी पुरवठा करण्यास वीज पुरवठा सुरळीत नसल्याने अडचणी येतात. या ठिकाणी तेथील वीजेचे प्रश्न ही सोडवा आदी मुद्दे भाजपचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक किशोर आबा पवार यांनी मांडले.

जेहूर बँक प्रश्नावर आक्रमक भूमिका

तालुक्यातील जेहूर येथील पंजाब नॅशनल बँक शाखेतील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे ८०० शेतकऱ्यांची यादी अपलोड न झाल्याने शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत आली नाही. ही बाब गंभीर असून अशा अधिकारी कर्मचाऱ्याना निलंबीत केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या बाबत असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही असा आक्रमक पवित्रा घेवून आमदार संजना जाधव यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.