Sambhajinagar News : शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निकाली

मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.१९) प्रादेशिक विद्या प्राधिकरण, जुने शिक्षण उपसंचालक कार्यालय शिक्षक दरबार आयोजित करण्यात आला होता.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निकालीfile photo
Published on
Updated on

Teachers' pending issues resolved

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.१९) प्रादेशिक विद्या प्राधिकरण, जुने शिक्षण उपसंचालक कार्यालय शिक्षक दरबार आयोजित करण्यात आला होता. अनेक शिक्षकांची प्रलंबित प्रश्न शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी या दरबारात संबंधित अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून निकाली काढले. शिक्षक आमदार व संबंधित सर्व अधिकारी यांच्यासमोरच प्रलंबित प्रश्न मांडण्याची संधी उपस्थितांना मिळाली.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : 'आईसाठी तरी जग...' दोन तासांची मनधरणी ठरली निष्फळ !

आश्वासित प्रगती योजना दहा वीस तीस, अंशतः अनुदानित टप्पा वाढ, शिक्षकांना कॅशलेस वैद्यकीय सेवा, जुनी पेन्शन योजना, सेवा संरक्षण व इतर शिक्षक बंधू भगिनी यांचे राज्यस्तरावरील प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न चालू असून लवकरच राज्यस्तरीय प्रश्न निकाली निघेल असे आश्वासन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिले.

Sambhajinagar News
Crime News : न्यायाधीशांच्या खात्यातून ७ लाख हडपून असिस्टंट पळाला स्पेनला

यावेळी छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षण उपसंचालक कैलास दातखीळ, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे, शिक्षण अधिकारी योजना राकेश साळुंके, प्राचार्य राजेंद्र कांबळे व त्यांच्या अधिनस्त सर्व अधिकारी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे, राष्ट्रवादी शिक्षक संघ प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष मनोज खुटे, राष्ट्रवादी शिक्षक संघ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा डांगे, रमाकांत छडीदार, वाहेद शेख, विलास उमाप आरेफ शेख, अकिल पठाण, योगेश गायकवाड व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news