Teacher non-academic work : अशैक्षणिक कामकाजाविरोधात शिक्षकांचे असहकार आंदोलन

आम्हाला शिकू द्या, मराठी शाळा टिकू देण्याची शिक्षकांची मागणी
Teacher agitation
Teacher agitation : अशैक्षणिक कामकाजाविरोधात शिक्षकांचे असहकार आंदोलनfile photo
Published on
Updated on

Teachers' non-cooperation movement against non-academic work

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : अशैक्षणिक कामकाज आणि प्रशासनाच्या विविध धोरणांविरोधात खुलताबाद तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. गुरुवारी (दि. १७) शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी गोरक्ष गाजरे यांना निवेदन देत 'आम्हाला शिकवू द्या, मराठी शाळा टिकू द्या' अशी भूमिका मांडली.

Teacher agitation
Maratha reservation : मराठा आरक्षण शासनादेशात दुरुस्ती करून ओबीसीसारख्या सर्व सवलती द्या !

शिक्षक समन्वय समितीच्या निर्णयानुसार तालुक्यातील शिक्षकांनी सर्व शासकीय व प्रशासकीय व्हॉट्सअॅप समूहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार मागविण्यात येणारी ऑनलाइन माहिती, वाढता अशैक्षणिक कामांचा ताण आणि २४ तास सुरू असलेल्या माहितीच्या ससेमिऱ्यामुळे अध्यापनावर परिणाम होत असल्याचे शिक्षकांनी निवेदनात म्हटले आहे.

यापुढे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि दर्जेदार अध्यापनाला प्राधान्य देण्यात येईल. प्रशासकीय माहिती केवळ कार्यालयीन वेळेत अधिकृत पत्राद्वारेच स्वीकारली व दिली जाईल, अशी भूमिका समितीने स्पष्ट केली.

यावेळी शिक्षक समन्वय समितीचे मनोहर गावडे, नितीन पाटील, राजू लहाने, गणेश शेळके, नितीन अंतरकर, अशोक विघ्ने, हेमंत सुतार, संजय वैष्णव, नदीम शेख, प्रवीण देशमुख, शफीक जमादार, संगीता ठाकूर, यांच्यासह तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

Teacher agitation
Sillod Crime : तलवारीचा धाक दाखविणारा पोलिसांच्या ताब्यात

शिक्षकांच्या प्रमुख मागण्या

अशैक्षणिक कामांचा ताण कमी करा

वारंवार मागविण्यात येणारी ऑनलाइन माहिती बंद करा

२४ तासांच्या प्रशासकीय संदेशांचा ससेमिरा थांबवा

शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ द्या

शाळाबाह्य यंत्रणेकडून होणारे अनधिकृत चित्रीकरण थांबवा

पूर्वसूचना व नोटीसशिवाय एकतर्फी कारवाई करू नका

प्रशासकीय माहिती केवळ कार्यालयीन वेळेत व अधिकृत पत्राद्वारे द्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news