Teachers News
Teachers News : सीटीईटी सूट असूनही शिक्षकांवर गुन्हेfile photo

Teachers News : सीटीईटी सूट असूनही शिक्षकांवर गुन्हे

गंगापूर : शिक्षक सेनेचे तहसीलदारांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
Published on

Teachers News: Crimes against teachers despite CTET exemption

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ७फेब्रुवारी रोजी पार पडली सीटीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना सूट देऊनहीं त्यांच्यावर गैरहजेरीबद्दल गुन्हे दाखल क? ण्यात आले. शिक्षक सेनेने याप्रश्नावर तहसीलदारांन निवेदन दिले असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Teachers News
शेतकऱ्यांनी मका आणला बाजार समिती कार्यालयात

राज्य निवडणूक आयोगाने ३ फेब्रुवारी रोजी सिटीइटी परीक्षा (७ व ८ फेब्रुवारी) देणाऱ्या सर्व शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निर्देशही दिले होते. गंगापूर तालुक्यातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सूट असलेल्या शिक्षकांवर हजर न राहिल्याबद्दल गुन्हे दाखल केल्याचा आरोप शिक्षक सेनेने केला आहे.

या कारवाईमुळे संबंधित शिक्षकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून, काहींना निवडणुकीच्या दिवशी धमकीचे फोन आल्याने सिटीइटी परीक्षा देता आली नसल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. निवडणूक विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

Teachers News
दशमेश नगरमध्ये सोसायटीतील घराला आग

शिक्षक सेनेच्या वतीने तहसीलदार नवनाथ वगवाड यांना निवेदन देऊन संबंधित गुन्हे तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

या निवेदनावर शिक्षकसेना मराठवाडा उपाध्यक्ष अनिल काळे, जिल्हा सरचिटणीस भगवान हिवाळे, तालुकाध्यक्ष राजेंद्र बोल्डे, नीलेश कहाटे, जावेद पटेल, ज्ञानेश्वर पवार, राजीव शंके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संघटनेचा आरोप

निवडणूक प्रक्रियेत शिक्षकांनाच लक्ष्य केले जाते. ग्रामसेवक व तलाठी यांना प्रत्यक्ष ड्युटीवर न लावता शिक्षकांवरच कारवाई केली जाते. सेवा ज्येष्ठ शिक्षकांना बिएलओ म्हणून तर कनिष्ठांना पर्यवेक्षक म्हणून नेमणुका दिल्या जातात. तहसील कार्यालयातील प्रतिनियुक्तीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत असल्याची खंत व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news