शेतकऱ्यांनी मका आणला बाजार समिती कार्यालयात

लिलावात व्यापाऱ्यांना झुकते माप, दुजाभाव होत असल्याचा आरोप
Vaijapur news
शेतकऱ्यांनी मका आणला बाजार समिती कार्यालयातfile photo
Published on
Updated on

Farmers brought maize to the market committee office

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा :

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याच्या ऐवजी बाजार समितीचे प्रशासन लिलाव प्रक्रियेत व्यापाऱ्यांना पाठीशी घालून शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव करत आहे. त्यामुळे एकाच दर्जाच्या मकाला कमी जास्त भाव मिळून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, असा आरोप करत भायगाव (तालुका वैजापूर) येथील शेतकऱ्यांनी लिलावासाठी पाच ट्रॅक्टरमधून आणलेली जवळपास दोनशे क्विटल मका थेट बाजार समिती कार्यालयाच्या आवारात आणली. या मकाला लिलावात व्यापाऱ्यांकडून प्रतिक्विटल एक हजार ६१८ रुपये भाव देण्यात आला.

Vaijapur news
दशमेश नगरमध्ये सोसायटीतील घराला आग

याच प्रतीच्या मका असलेल्या २६ वाहनाला प्रतिक्विटल १७०० ते १७३६ रुपये भाव देण्यात आला. मग हा दुजाभाव का, असा संतप्त सवाल मका उत्पादकांनी प्रशासनाला केला. आम्हाला १७०० रुपये भाव द्या, अशी मागणी करत लक्ष्मण ठोंबरे यांच्यासह मनोज नळे, विजय अंभोरे, उमेश उशीर, भावराव ठोंबरे, अरुण जाधवर, भावलाल जाधव या शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सचिव प्रल्हाद मोटे व सहाय्यक सचिव एस. के. निकम यांना घेराव घातला वं त्यांना धारेवर धरले.

यावर मोटे व निकम यांनी या शेतकऱ्यांना पाच वाजता होत असलेल्या लिलाव प्रक्रियेत पुन्हा सहभाग नोंदवण्याची सूचना केली. मात्र ही सूचना मान्य न झाल्याने मकाचे पाचही ट्रॅक्टर समिती कार्यालयाच्या आवारात उभे करण्यात आले. प्रशासनाने हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली.

Vaijapur news
विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

दराची दिली माहिती

शनिवारी झालेल्या लिलावात ४६ वाहनांना १४०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला तर २६ वाहनांना १७०० ते १७३६ रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समिती प्रशासनातर्फे देण्यात आली. दरम्यान, शासनाने एफएक्यू दर्जाच्या मकासाठी प्रतिक्विटल दोन हजार ४६० रुपये भाव जाहीर केला आहे. जोपर्यंत संचालक मंडळ यावर निर्णय घेत नाही, तोपर्यंत येथून ट्रॅक्टर हलवणार नाही, अशी भूमिका मका उत्पादकांनी घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news