

मन्सुर कादरी
सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील १०४ ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत २१ हजार १९७ घरकुल मंजूर झालेले आहेत. मंजूर पात्र लाभार्थीपैकी १ हजार ५ पात्र लाभार्थीनी अद्यापही आवश्यक असलेले कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे जमा केलेली नाहीत. ज्या लाभार्थीनी अद्यापही कागदपत्रे जमा केलेली नाहीत, अशा लाभार्थीनी तातडीने आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे जमा करावी नसता वरील घरकुले रद्द करण्यात येतील, अशी माहिती गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील बेघर नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल दिली जात आहेत. सिल्लोड तालुक्यात ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत सन २०२४- २०२५ व २०२५ २०२६ या आर्थिक वर्षातील १०४ ग्रामपंचायतीमध्ये स्वतःचे घर नसलेल्या अशा नागरिकांना घरकुल मंजूर करण्यात आलेले आहे.
सिल्लोड तालुक्यात २१ हजार १९७ घरकुल मंजूर लाभार्थांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे. तसेच त्यांच्या डोक्यावर छत असावे म्हणून पात्र गरजू लाभार्थीना प्रधानमंत्री आवास योजनेतून ही घरकुल मंजूर झाली आहेत. त्यामुळे पात्र मंजूर यादीतील लाभार्थीनी तात्काळ ग्रामपंचायतीशी संपर्क साधून परिपूर्ण प्रस्ताव ग्रामपंचायत अधिकारी व रोजगार सेवक यांच्याकडे तात्काळ जमा करावा अन्यथा मंजूर पात्र यादीतील प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत कागदपत्रे दाखल न केलेल्या संबंधित लाभार्थांचे घरकुल रद्द करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थीची राहील, याबाबत लाभार्थीनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन गटविकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड रत्नाकर पगार यांनी केले आहे. ज्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा केलेली नाही, अशा लाभार्थीची यादी ग्रामपंचायतीकडे आहे. करिता अशा लाभार्थीनी आपल्या ग्रामपंचायतीकडे संपर्क साधावा, असेही आवाहन बीडीओ रत्नाकर पगार यांनी केले आहे.
तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींतील पात्र मंजूर यादीतील लाभार्थीना ग्रामपंचायतीमार्फत वारंवार परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याविषयी ग्रामपंचायत अधिकारी व रोजगार सेवक यांनी कळूनही अद्यापपर्यंत १००५ लाभार्थीनी ग्रामपंचायतींना कागदपत्रे आधार कार्ड, जागेचा पुरावा व बँक पासबुक दाखल केलेले नसून, त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिमी प्रशासना हैराण झाले.