

छत्रपती संभाजीनगर : वाढती विजेची गरज आणि दरमहा येणाऱ्या वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी घरगुती ग्राहक आता 5 सौरऊर्जेकडे वळत आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला छत्रपती संभाजीनगर परिमंडलात प्रतिसाद मिळाला असून, ७१ हजार ८७२ घरांच्या छतांवर २५२.२२ मेगावॅट स्थापित - क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.
या योजनेअंतर्गत ग्राहकांना अनुदान मिळत असल्याने घरगुती ग्राहकांचा सौरऊर्जेकडे कल वाढला आहे. या योजनेत एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. गृहनिर्माण संस्था, गृहसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व सामायिक उपयोगासाठीही अनुदान देण्यात येत आहे.
परिमंडलात आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर शहरात ३६ हजार ४०७ ग्राहकांनी १२९.३८ मेगावॅट, ग्रामीण मंडलात-२१ हजार ७९९ ग्राहकांनी ७५.२२ मेगावॅट तर जालना मंडलातील १३ हजार ६६६ ग्राहकांनी ४७.६१ मेगावॅट स्थापित क्षमतेचे सौर ऊर्जा संच घरावर उभारले आहेत.
लाभ घेण्याचे आवाहन
३०० युनिटपर्यंत मासिक 4 वीजवापर असणाऱ्या घरगुती वीजग्राहकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे. सुमारे २५ वर्षे या सौर प्रकल्पांतून घरातील वीजवापरासाठी जवळपास मोफत वीज उपलब्ध होणार आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता.