संभाजीनगर विभागातील ऊस गाळप एक कोटी मेट्रिक टनांच्या उंबरठ्यावर

२६ कारखान्यांना परवानगी त्यापैकी २५ कार्यरत आहेत
sambhajinagar news
संभाजीनगर विभागातील ऊस गाळप एक कोटी मेट्रिक टनांच्या उंबरठ्यावरfile photo
Published on
Updated on

Sugarcane crushing in Sambhajinagar division reaches the threshold of one crore metric tons

सिडको छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर विभागात यंदाच्या हंगामातील ऊस गाळप एक कोटी मेट्रिक टनांच्या उंबरठ्यावर पोहोचले असून, मराठवाड्यातील साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे. विभागातील सहा जिल्ह्यांपैकी मराठवाड्यातील जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांत २२ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक नऊ कारखाने कार्यरत आहेत.

sambhajinagar news
महापालिकेतील खासगी टँकरचे ऑडिट करा

यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्यात आला असून, तो गतवर्षीपेक्षा १५ दिवस अगोदर सुरू झाला आहे. विभागातील मराठवाड्यातील २२ तसेच खान्देशातील नंदुरबार (२) व जळगाव (१) अशा एकूण २५ कारखान्यांनी १२ फेब्रुवारी अखेर ९८ लाख २४ हजार ५३९ मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे.

या उसापासून ७८ लाख २९ हजार ७७५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने दिली. दरम्यान, देवगिरी सहकारी मिळूनही प्रत्यक्ष गाळप सुरू झालेले नाही. विभागात एकूण २६ कारखान्यांना परवाना देण्यात साखर कारखान्यास गाळप परवाना आला असून, त्यापैकी २५ कारखाने कार्यरत आहेत. त्यामध्ये खासगी ९, तर सहकारी १४ कारखाने आहेत.

sambhajinagar news
उस्मानपुऱ्यात नळांना ड्रेनेज मिश्रित पाणी

छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना यांसह खान्देशातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांचा या विभागात समावेश होतो. १३ फेब्रुवारीअखेर २२ कारखान्यांचा साखर उतारा ७.९७ टक्क्यांवर पोहोचला असून, गतवर्षी तो ७.३६ टक्के होता. यंदा उताऱ्यात किंचित वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news