महापालिकेतील खासगी टँकरचे ऑडिट करा

माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
Water Tanker
महापालिकेतील खासगी टँकरचे ऑडिट कराFile Photo
Published on
Updated on

Ambadas Danve Audit private tankers in the municipal corporation

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नो नेटवर्क भागासह विविध वसाहतींतध्ये महापालिकेकडून टँकरद्वारे पाणीप-रवठा केला जात आहे. या टँकर व्यवस्थेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत माजी विर-ोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संपूर्ण व्यवस्थेचे स्वतंत्र आणि सखोल ऑडिट करण्याची मागणी शनिवारी (दि.१४) आयोजित पत्रकार परिषदेत केली.

Water Tanker
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकतेचा संदेश

दानवे म्हणाले, शहरात सुरू असलेले बहुतांश टँकर हे खासगी कंत्राटदारांचे आहेत. या टँकरची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) आवश्यक तपासणी झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला. तसेच संबंधित टँकरची अधिकृत नोंद महापालिकेकडेही उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.

यासह टँकरची क्षमता, प्रत्यक्ष पुरवठा होणारे पाण्याचे प्रमाण आणि त्यानुसार दिली जाणारी बिले यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. यात काही अधिकारी व कर्मचारी संबंधित कंत्राटदारांना पाठिशी असल्याचा आरोप करत दानवे यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केली.

Water Tanker
महापालिकेत वंचित-काँग्रेस एकत्र

दरम्यान मनपाच्या कारभारावर टीकास्त्र सोडत पाणीपुरवठा ही नागरिकांच्या आरोग्याशी निगडित मूलभूत सेवा असल्याने त्यात कोणतीही आर्थिक किंवा प्रशासकीय अनियमितता सहन केली जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी लवकरात लवकर ऑडिट करण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news