

ST's special drive is only on paper
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : नवीन वर्ष उजाडण्याआधीच शिवशाही बसच्या ब्रेक डाऊनचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी स्पेशल ड्राईव्ह घेतला होता. तेवढे करूनही शिवशाही सह इतर बसच्या ब्रेक डाऊनमध्ये सुधारणा होत नसल्याने स्पेशल ड्राईव्ह कागदावर राहिला. ब्रेक डाऊनच्या वाढत्या प्रमाणामुळे चालक-वाहकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एसटीच्या साध्या बससह शिवशाही रेडी टू पार्क बस आगाराच्या बाहेर पडताच बंद पडत आहेत, तर काही वसचे गिअर अटकत आहेत. देखभाल दुरुस्तीनंतरही ही अवस्था असल्याने चालक वाहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शुक्रवारी (दि.१४) मुख्य बसस्थानकातील दोन ते तीन बस आगाराबाहेर पडताच अचानक बिघाड झाल्याने त्या परत आणाव्या लागल्या.
पर्यायी बससाठी चालक-वाहकांना कर्तव्यासाठी ताटकळावे लागत आहे. एसटीने डिसेंबर २०२४ मध्ये शिवशाहीच्या देखभाल दुरुस्तीचा स्पेशल ड्राईव्ह घेतला होता. त्यात सुधारणा करण्यात येणार होत्या, परंतु स्पेशल ड्राइव्ह घेऊनही यात सुधारणा होत नसल्याने प्रवाशांकडूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे.