Sambhajinagar Crime : बेपत्ता चिमुकलीचा विहिरीत आढळला मृतदेह

घातपाताचा संशय, ४०० मीटर अंतरावर विहीर
Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crime : बेपत्ता चिमुकलीचा विहिरीत आढळला मृतदेहFile Photo
Published on
Updated on

Missing girl's body found in well

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पिसादेवी ते पळशी रस्त्यालगत असलेल्या ओंकार सिटी या बांधकाम साईटवर मजुरी करणाऱ्या मध्यप्रदेशच्या दाम्पत्याची साडेपाच वर्षांची मुलगी राशी शिनू चव्हाण मंगळवारी (दि.११) दुपारी दोनच्या सुमारास खेळता खेळता अचानक बेपत्ता झाली होती. चिकलठाणा पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके कसून शोध घेत होती. परिसरातील सर्व विहिरी, तलावात शोध घेतला मात्र पोलिसांना यश आले नाही. अखेर शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी सातच्या सुमारास बांधकामापासून ४०० मीटर अंतरावर शेतातील अडगळीच्या विहिरीत राशीचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

Sambhajinagar Crime
Municipal Election : महापालिका निवडणुकीत 'तारीख पे तारीख'चा खेळ

अग्निशमन आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राशीला शोधण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी दिवसरात्र एक केला होता. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभाग अधिकारी पूजा नागरे सातत्याने लक्ष देऊन तपासावावत सूचना देताना दिसले. चिकलठाणा निरीक्षक

रविकिरण दरवडे, एपीआय समाधान पवार, पीएसआय उत्तम नागरगोजे, धुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सर्वत्र शोध घेत असताना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पळशी रोडवरील परदेश्वर मंदिराजवळ रस्त्यापासून ३० फूट आत ढाकणे यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह फुगून पाण्यावर तरंगताना आढळून आला. उपनिरीक्षक पारदे यांनी तात्काळ अग्निशमनला कळविले. चिकलठाणा येथून ड्यूटी अधिकारी सोमीनाथ भोसले, जवान अनिकेत लांडगे, राजू राठोड, लालचंद दुबेले, विलास झरे, गीते यांनी घटनास्थळाकडे बंब घेऊन धाव घेतली. पाण्यातून मृतदेह बाहेर काढून चिकलठाणा पोलिसांच्या स्वाधीन केला. मृतदेह घाटी येथे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला.

Sambhajinagar Crime
क्रांती चौक ते पैठणगेट रस्त्याचे टोटल स्टेशन सर्व्हे करा !

झाडाझुडपात विहीर, उंच कठडे

साडेपाच वर्षे वयाची राशी बांधकाम साईडपासून सुमारे अर्धा किलोमीटर दूर असलेल्या शेतात गेली कशी? रस्त्यापासून ३० फूट अंतरावर आत बांधलेली विहीर आहे. शेतात एका बाजूला ऊस, तूर, चिकूची झाडे, पेरूची झाडे आहेत. विहिरीला ३ फूट उंचीचे कठडे आहे. त्यामुळे राशी विहिरीत पडली की घातपात झाला? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. विहिरीला सुरक्षा जाळीही नाही.

पायात शूज, फॉक जशास तसा

चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक, फॉरेन्सिकच्या पथकाला पाचारण केले होते. अर्धा तास श्वान परिसरात फिरविण्यात आला. त्यानंतर अग्निशमनच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. राशीच्या अंगातील फॉक, पायातील शूज सर्वकाही व्यवस्थित दिसून आले. तिच्या शरीरावर काही जखमा असतील तर त्या घातपातामुळे किंवा कसे हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. डीवायएसपी पूजा नागरे, पोलिस निरीक्षक दरवडे घटनास्थळी उपस्थित होते.

'त्या' एक तासात गायब

राशी मंगळवारी दुपारी एकच्या बांधकाम इमारतीच्या खाली वाळूवर खेळत होती. दीड वाजता तिचे वडील जेवण करण्यासाठी खाली आले. तिचा मामा बाजूला वाळू चाळत होता. त्यानंतर ते दोघे जेवण करण्यासाठी गेले. तासाभरात परत आल्यानंतर राशी त्यांना दिसून आली नाही. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने बुधवारपासून परिसरातील विहिरी, तलाव, रानमाळ पालथे घातले. परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र राशीचा काहीही ठावठिकाणा लावण्यात यश आले नव्हते.

पेरूसाठी गेल्याची शक्यता

राशीला पेरू खाण्याची आवड होती. ती नेहमी फ्रॉकमध्ये पेरू भरून घरी घेऊन येत होती, असे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे शेतात पेरू आणण्यासाठी ती गेली असावी, असाही संशय पोलिस निरीक्षक दरवडे यांनी व्यक्त केला. मात्र सर्व बाजूने तपास केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news