Sambhajinagar Crime News : दारूसाठी पैसे न दिल्याने दिव्यांग भिक्षेकऱ्याची टीव्ही सेंटरवर वॉकरने डोके ठेचून निर्घृण हत्या

चार वर्षांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या हत्येच्या गुन्ह्यातील माफीचा साक्षीदारच निघाला आरोपी
Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime News : दारूसाठी पैसे न दिल्याने दिव्यांग भिक्षेकऱ्याची टीव्ही सेंटरवर वॉकरने डोके ठेचून निर्घृण हत्याPudhari File Photo
Published on
Updated on

Differently-abled beggar brutally murdered by having his head smashed for refusing to give money for alcohol

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या क्षुल्लक कारणावरून, एका नशेखोराने ७५ वर्षीय दिव्यांग भिक्षेकऱ्याची त्यांच्याच वॉकरने डोके ठेचून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टीव्ही सेंटर येथील महानगरपालिकेच्या अकबर पठाण झोन कार्यालयाच्या गेटसमोर रविवारी (दि. ६) मध्यरात्री हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, चार वर्षांपूर्वी याच परिसरात झालेल्या एका हत्येच्या गुन्ह्यात 'माफीचा साक्षीदार' बनलेल्या तरुणानेच हा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

Sambhajinagar Crime News
Crime News : महिलांना कामावरून काढल्याने हेड पोस्ट ऑफिसमध्ये राडा

अकबर ऊर्फ बंटी अजीम पठाण (२३, रा. रशीदपुरा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेला अज्ञात दिव्यांग भिक्षेकरी गेल्या काही महिन्यांपासून टीव्ही सेंटर येथील मनपा झोन कार्यालयाच्या गेटसमोरच बसलेला असायचा. तर, आरोपी अकबर पठाण हा याच परिसरात नशापाणी करण्यासाठी भटकायचा.

रविवारी रात्री अकबरने या भिक्षेकऱ्याकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. भिक्षेकऱ्याकडे पैसे नसल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या अकबरने भिक्षेकऱ्याला आधारासाठी असलेले वॉकर हिसकावून घेतले आणि त्याच वॉकरने त्यांच्या डोक्यात व हातावर प्रहार करण्यास सुरुवात केली. डोक्यात जबर घाव लागल्याने भिक्षेकरी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीने तेथून धूम ठोकली.

सूत्रांच्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी (२०२२) टीव्ही सेंटर मैदानावरील एका गाळ्यात सिद्धार्थ साळवे ३६) या तरुणाची दारू पिण्यावरून झालेल्या वादातून दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आली होती. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न झाला होता. या हत्या प्रकरणात पोलिसांनी आयाज या जेसीबी चालकाला अटक केली होती. त्यात अकबर पठाण हादेखील आरोपी होता. मात्र, कारवाईदरम्यान तो पोलिसांचा 'माफीचा साक्षीदार' बनला. त्या गुन्ह्यातून सुटल्यानंतर आता चार वर्षांनी पुन्हा त्याच परिसरात भिक्षेकऱ्याच्या हत्येच्या प्रकरणात तो गजाआड गेला आहे.

Sambhajinagar Crime News
Ganeshotsav 2026 : धर्मादायकडे २३२ गणेश मंडळांची नोंदणी

सीसीटीव्हीवरून छडा

सोमवारी सकाळी ही घटना सिडको पोलिसांना समजली. पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल येरमे, उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपीचे धागेदोरे मिळाले. त्याआधारे गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अमोल देशमुख, दिलीप मोदी, बाळू नागरे, विशाल सोनवणे, शैलेश आस्कर यांच्या पथकाने अकबरला पंचायत समिती भागातून ताब्यात घेतले. त्याला सिडको पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

मुकुंदवाडी भागात नाल्यात आढळला मृतदेह

एपीआय कॉर्नर जवळील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाशेजारील नाल्यात सोमवारी (७ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाच ते पावणेसहा वाजेच्या सुमारास एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मृताचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून उंची ५ फूट ६ इंच आहे. विशेष ओळख म्हणून त्याच्या अंगावर 'S. एस' असे गोंदलेले आहे. या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्याचा मृतदेह घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण समजू शकेल अशी माहिती पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news