Sambhajinagar News : सुसाट कारची दुचाकीला धडक; सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू

चिकलठाणा एमआयडीसीत आयटी पार्कसमोर मध्यरात्री अपघात
Sambhajinagar News
Sambhajinagar News : सुसाट कारची दुचाकीला धडक; सख्ख्या भावांचा जागीच मृत्यूfile photo
Published on
Updated on

Speeding car rams into two-wheeler; real brothers die on the spot

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कुटुंबाला हातभार लावण्यासाठी दोन महिन्यांपूर्वीच शहरात आलेल्या दोन सख्ख्या भावांवर काळाने झडप घातली. रात्री मोठ्या भावाला घेऊन येताना सुसाट कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२०) मध्यरात्री २ वाजता चिकलठाणा एमआयडीसीतील आयटी पार्कच्या मागील रस्त्यावर घडली. निखिल अंकुश आरके (२३) आणि कपिल अंकुश आरके (१९, दोघे रा. मूळ सिल्लोड, सध्या रा. आंबेडकरनगर, गल्ली नं. १२) अशी मृत निखिल, कपिल आरके मृतांची नावे आहेत.

Sambhajinagar News
Maratha reservation : मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई ते आमरण उपोषण

निखिल आणि कपिल हे दोघेही भाऊ सिडकोतील एका मॉलमध्ये नोकरी करत होते. बुधवारी रात्री नऊ वाजता कपिलची ड्युटी संपली आणि तो घरी आला. मोठा भाऊ निखिलची ड्युटी संपण्याची वेळ झाल्याने कपिल त्याला आणण्यासाठी दुचाकीवरून पुन्हा मॉलकडे गेला होता. निखिलला घेऊन कपिल परतत असताना सुसाट कारने (एमएच-२८-बीएस-०९९०) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणपत राहिरे, सहायक निरीक्षक भरत पाचोळे आणि उपनिरीक्षक काळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

Sambhajinagar News
Lack of Rainfall पावसाने दडी मारल्याने कडेठाण परिसरातील शेतकरी हवालदिल

उदरनिर्वाहाचा कणाच मोडला

अंकुश आरके हे सिल्लोडमध्ये मिस्त्रीकाम करून कुटुंबाचा उदर्निवाह करत होते. त्यांना या दोन मुलांसोबत एक लहान मुलगी आहे. मुले मोठी झाल्याने त्यांनी नोकरी करून कुटुंबाला हातभार लावावा, या आशेने त्यांना शहरात मामाकडे पाठवले होते. दोघांनाही मॉलमध्ये नोकरी लागल्याने घराची हलाखी आता दूर होईल, अशी आशा कुटुंबाला होती. मात्र, एकाच रात्रीत आरके कुटुंबाचा कणाच मोडला. एकाच वेळी दोन्ही तरुण मुलांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. या अपघाताचा पुढील तपास सहायक निरीक्षक कैलास लहाणे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news