South Central Railway : प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुखकर

४ रेल्वेंना चेयर कार डबेः १९ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी
South Central Railway
South Central Railway : प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुखकरfile photo
Published on: 
Updated on: 

South Central Railway: Passenger travel to become more comfortable

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत धावणाऱ्या ४ डब्यांच्या पॅसेंजर रेल्वेच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी आधुनिकीकरणाच्या दृष्टीने या गाड्यांमधील पारंपरिक जनरल डबे काढून त्याऐवजी आधुनिक सेकंड क्लास चेयर कार डबे जोडण्यात येणार आहेत.

South Central Railway
Manoj Jarange : तर मराठा समाजाने आगामी निवडणुकीत धडा शिकवावा : जरांगे

येत्या १९ नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. सध्या या चारही रेल्वेगाड्यांना १६ डबे जोडले जातात, ज्यामध्ये १४ जनरल सेकंड क्लास आणि २ लगेज-कम-ब्रेक व्हॅन डब्यांचा समावेश होता. नव्या बदलानुसार, संख्या १६ इतकीच कायम राहणार असली तरी, आता १४ जनरल डब्यांऐवजी १४ सेकंड क्लास चेयर कार आणि २ एसएलआर डबे जोडले जातील. चेयर कार डब्यांमुळे दैनंदिन व मध्यम पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी अधिक आरामदायी जागा उपलब्ध होणार आहे.

South Central Railway
Fire Sub-Stations : शहरात २ ठिकाणी अग्निशमन उपकेंद्र उभारण्याच्या हालचाली

बदल लागू होणाऱ्या रेल्वेगाड्या

नांदेड-मनमाडः नांदेड येथून १९ नोव्हेंबर पासून, तर मनमाड येथून २० नोव्हेंबर पासून बदल लागू. पूर्णा-आदिलाबादः पूर्णा येथून २० नोव्हेंबर पासून, तर आदिलाबाद येथून २१ नोव्हेंबर पासून, परळी वैजनाथ-अकोला: परळी वैजनाथ येथून २१ नोव्हेंबर पासून, तर अकोला येथून २२ नोव्हेंबर पासून, पूर्णा-परळी वैजनाथ : पूर्णा आणि परळी वैजनाथ या दोन्ही स्थानकांवरून २२ नोव्हेंबर पासून हा बदल लागू होणार असल्याची माहिती नांदेड विभागाने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.