Fire Sub-Stations : शहरात २ ठिकाणी अग्निशमन उपकेंद्र उभारण्याच्या हालचाली

साताऱ्यात जागा निश्चित : शहागंजमध्येही जागेची चाचपणी, आपत्कालीन सेवेला मिळणार बळ
Fire Sub-Stations
Fire Sub-Stations : शहरात २ ठिकाणी अग्निशमन उपकेंद्र उभारण्याच्या हालचालीfile photo
Published on: 
Updated on: 

Moves underway to set up fire sub-stations at two locations in the city

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात दोन ठिकाणी अग्निशमन उपकेंद्र उभारण्याच्या महापालिकेकडून हालचाली सुरू आहेत. यात नव्या वसाहतींचा मोठ्याप्रमाणावर समावेश ही असलेल्या सातारा आणि जुन्या शहरातील शहागंज या दोन महत्त्वाच्या भागांत अग्रिशमन उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. यातील सातारा परिसरात उपकेंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली असून, शहागंज भागात योग्य जागेची चाचपणी सुरू असल्याची माहिती सोमवारी (दि. १६) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Fire Sub-Stations
Sambhajinagar News : नागरिकांचा विरोध झुगारून स्मार्ट मीटर बसवण्याची घाई

शहराचा वाढता विस्तार आणि अरुंद रस्त्यांमुळे आगीच्या घटनांवर तातडीने नियंत्रण मिळविण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता महापालिकेने अग्रिशमन यंत्रणेच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्या शहरातील आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पदमपुरा येथील मुख्य अग्निशमन केंद्रासह सेव्हन हिल, कांचनवाडीतील उपकेंद्रांमधून बंब रवाना केले जातात.

मात्र, शहराच्या वाढत्या विस्तारामुळे अनेक भागांत पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाला वेळ लागतो. विशेषतः जुन्या शहरातील दाट लोकवस्ती, अरुंद रस्ते आणि बाजारपेठांच्या परिसरात आग लागल्यास घटनास्थळी आव्हानात्मक परिस्थितीत जवळच अग्निशमन उपकेंद्र उपलब्ध असल्यास तातडीने मदत पोहोचविणे शक्य होणार आहे. दरम्यान, शहागंज हा शहरातील जुना भाग आहे. या भागात गजबजलेला व्यापारी आणि निवासी वसाहती अग्निशमन बंब पोहचण्यासाठी ठरते.

Fire Sub-Stations
Sambhajinagar News : दिवाळीनंतर जलयोजनेच्या कामांना पुन्हा गती

येथील बाजारपेठ, दाट वस्ती आणि अरुंद रस्त्यांचा विचार करता या परिसरातही स्वतंत्र अग्निशमन उपकेंद्राची गरज व्यक्त होत आहे. त्यासाठी महापालिकेकडून जागेची चाचपणी सुरू आहे. जागा निश्चित झाल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच सातारा परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती वाढल्या आहेत. या भागातील वाढती लोकसंख्या आणि नव्याने विकसित होणाऱ्या वसाहती लक्षात घेऊन अग्निशमन उपकेंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सातारा, देवळाई आणि आसपासच्या परिसराला या उपकेंद्राचा लाभ होवू शकतो.

उपकेंद्रांमुळे प्रतिसाद वेळ होणार कमी

शहराच्या वेगवेगळ्या भागांत अग्निशमन उपकेंद्रे सुरू झाल्यास आगीच्या घटनांवेळी मुख्य केंद्रावर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल. जवळच्या उपकेंद्रातून बंब रवाना करता येणार असल्याने घटनास्थळी पोहोचण्याचा वेळ कमी होऊन जीवित आणि वित्तहानी टाळण्यास मदत होणार आहे. याचा फायदा शहरातील नागरिकांना होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.