

Social media has dealt a major blow to the promotional materials business
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कोणत्याही निवडणुका म्हटल्या की प्रचारासाठी झेंडे, टोपी, बॅचेससह स्टिकर आदी साहित्य लागतेच. मात्र सोशल मीडियाच्या लक्ष्मण माळवदे चलतीने प्रचार साहित्य विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे.
प्रभाग रचनेमुळेही व्यवसायाला फटका बसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. आतापर्यंत अवघे पंधरा ते वीस टक्के विक्री झाल्याने लाखोंचा माल तसाच पडून असल्याचे हताश उद्गारही विक्रेत्यांनी काढले महापालिका निवडणुकीचा रणधुमाळीला वेग आला असून, विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांच्या प्रचार रॅलींची धूम सुरू आहे.
प्रभागात प्रचार फेरी आणि घरोघरी जाऊन मतदारांना प्रत्यक्ष भेट देण्यासह सोशल मीडियावरून प्रच- ाराची हवा सुरू आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचार साहित्य खरेदीला प्रतिसाद मिळालेला नाही. दुसरीकडे प्रभाग रचनेमुळे यंदाची निवडणूक काहीशी कठीण असल्याचे सांगत अनेक अपक्षांनी रिंगणातून माघार घेतली आहे. याचाही प्रचार साहित्य विक्रीला मोठा फटका बसत आहे.
सर्व राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांसाठी तयार केलेले झेंडे, टोपी, रुमाल, बॅचेस, पताका, स्टिकर, टी-शर्ट, मेटल बॅचेस यांसह वेगवेगळी चिन्हांची जेमतेम विक्री सुरू आहे. त्यामुळे गुंतवणूक केलेला पैसाही निघतो की नाही, अशी परिस्थिती असल्याचे विक्रेते म्हणाले.
तीन पिढ्यांचा व्यवसाय, आता बिकट स्थिती
कुठेही निवडणुका असल्याची की त्या ठिकाणी जाऊन प्रचार साहित्य विक्रीचे दुकान मांडतो. हा आमचा तीन पिढ्यांचा व्यवसाय असल्याचे जालना येथून शहरात प्रचार साहित्य विक्रीसाठी आलेले लक्ष्मण माळवदे यांनी सांगितले. मात्र सोशल मीडिया माध्यमांवर प्रचाराचा जोर असल्याने तसेच प्रभाग रचनेमुळेही अपक्ष उमेदवार घटल्याचा व्यवसायाला फटका बसत आहे. या निवडणुकीला अधिक बिकट स्थिती असल्याने व्यवसाय बंद करावा का ? अशी मनस्थिती झाल्याचे माळवदे म्हणाले.