

The saffron flag will fly over the municipal corporation once again
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रचाराला वेग आला असून, रविवारी (दि.११) शिव सेना उमेदवारांच्या प्रचारार्थ सिनेअभिनेते प्रवीण तरडे यांच्या उपस्थितीत सभा पार पडली.
या सभेत बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की, शिवसेना ही केवळ राजकीय पक्ष नसून, ती हिंदुत्वाची आणि सामान्य माणसाच्या हक्काची चळवळ आहे. प्रभाग २९ मधील सिद्धांत शिरसाट, अनिता घोडेले, श्वेता त्रिवेदी तसेच प्रभाग १८ मधील हर्षदा शिरसाट, छाया वाघचोरे, राजू राजपूत, अभिजित जीवनवाल हे उमेदवार तुमच्यातलेच असून, ते तुमचा आवाज महानगरपालिकेत पोहोचवतील. त्यामुळे धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून विकासाला मत द्या, असे आवाहन त्यांनी केले. ङ्गङ्घधनुष्यबाण ही महाराष्ट्राची शान आहे आणि ती शान कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे, फ्फअसे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही उपस्थितांना संबोधित करत विकासकामांचा दाखला देत सांगितले की, राजकारण हे जातीपातीचे नव्हे तर विकासाचे असावे. या भागातील विकासकामे जनतेसमोर आहेत आणि म्हणूनच शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतदान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे सर्व उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातून आले असून, ते जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव लढतील, असेही त्यांनी नमूद केले.सभेला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिवसेना उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.