

The BJP rally in ward 26 attracted attention
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीत सध्या प्रभाग २६ कडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या प्रभागात रविवार प्रचाराचा सुपर संडे ठरला असून, भाजपचे उमेदवार अप्पासाहेब हिवाळे, सविता कुलकर्णी, पद्मसिंह राजपूत, अनिता साळवे या चारही उमेदवारांनी १०० पदयात्रांचा रॅकॉर्ड करीत परिसर पिंजून काढला. या पदयात्रांना नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्यासोबतच प्रभागात चारही कमळ फुलवण्याचा निर्धार केला.
शहरात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. यात शेवटच्या रविवारी प्रभाग २६ अप्पासाहेब हिवाळे यांनी सहकुटुंब प्रचार पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या आई आसराबाई हिवाळे, पत्नी मीरा हिवाळे, बहीण नेहा पाटील, वर्षा खंडागळे, विठ्ठा पठाडे, प्रीती बागडे, सुनंदा हिवाळे, सुवर्णा हिवाळे, मीना हिवाळे, प्रतिभा देशमुख, देविका हिवाळे, लोखंडे काकू, विजया ढवळे, रुख्मण मोगल यांच्यासह अनिता कुमावत निकिता सरोदे, लता चव्हाण, सरला कवडे, नंदा कदम यांचा सहभाग होता. या पदयात्रेत महिलांची लक्षणीय गर्दी होती.
एवढेच नव्हे तर ठिकठिकाणी या पदयात्रेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांच्या गर्दीन सर्वांचेच लक्ष वेधले होते. उमेदवार अप्पासाहेब हिवाळे यांनी प्रत्येक भागात नागरिकांशी संवाद साधत आपल्यासह सविता कुलकर्णी, पद्मसिंह राजपूत, अनिता साळवे चारही भाजप उमेदवारांना निवडून द्यावे, अशी मागणी केली.
त्यांच्या या भावनिक सादला प्रत्येक नागरिकाने उत्स्फूर्तपणे साथ दिली. तसेच आम्ही येथे कमळच फुलवणार, अशी ग्वाहीही त्यांना दिली. प्रभागात ज्या ज्या भागात ही पदयात्रा गेली. तेथे नागरिकांनी चारही उमेदवारांचे स्वागत करीत जय घोष केला. रॅली, सभा आणि पदयात्रांनी या परिसराचे वातावरणात चांगलीच रंगत आली आहे.
भाजपला साथ द्या
प्रभागाच्या सर्वांगीण विकसासाठी भाजपचे उमेदवार अप्पासाहेब हिवाळे, सविता कुलकर्णी, पद्मसिंह राजपूत, अनिता साळवे या चारही उमेदवारांना निवडून द्या. प्रभागाच्या सर्व समस्या पुढील पाच वर्षे भाजपच्या असतील, असे आश्वासन आमदार अनुराधा चव्हाण यांनी मतदारांना दिले. तसेच मतदारांनीही त्यांना सहमती दर्शविली.