Sambhajinagar News : महापालिकेत मुदतवाढीचे राज्य

सोळा विभागांत सेवानिवृत्त अधिकारी, काहींना तीन वेळा मुदतवाढ
Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar News : महापालिकेत मुदतवाढीचे राज्यFile Photo
Published on
Updated on

Sixteen departments have retired officers, some have been extended three times

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून नियमित भरतीची कोणतीही प्रक्रिया न झाल्याने मनपात मुदतवाढीचे राज्य सुरू असून, तब्बल १६ महत्त्वाच्या विभागांत सेवानिवृत्त व करारावर नियुक्त अधिकारी नेमण्यात आले आहे. यातील काही अधिकाऱ्यांना तीन वेळा मुदतवाढ मिळालेली असून, सरकारने स्पष्ट नियम जारी करूनही या अधिकाऱ्यांना प्रशासकीय व वित्तीय अधिकार देण्यात आले असल्याने शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची चर्चा प्रशासनात चांगलीच रंगली आहे. यात तांत्रिक विभाग व विद्युत विभागातील प्रमाण अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar News : पाल आढल्याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा

गेल्या सात ते आठ वर्षांपासून मनपामध्ये नियमित भरतीची प्रक्रिया ठप्प आहे. त्यामुळे सध्या १६ महत्त्वाच्या विभागांमध्ये सेवानिवृत्त व करारावर नियुक्त अधिकारी काम पाहत आहेत. डिसेंबर २०१६ मधील शासन निर्णयात मुदतवाढीवरील किंवा करार पद्धतीने नियुक्त अधिकाऱ्यांना कोणतेही प्रशासकीय किंवा वित्तीय अधिकार देऊ नयेत, असे स्पष्टपणे नमूद आहे.

तसेच नियुक्त प्राधिकाऱ्यांनी अशा अधिकाऱ्यांच्या कामाचा नियमित आढावा घ्यावा, असेही त्या आदेशात आहे. मात्र प्रत्यक्षात हा नियम धाब्यावर बसवून मनपा प्रशासनात मुदतवाढीचे राज्य सुरू असल्याची चर्चा आहे. यात तांत्रिक विभाग, विद्युत विभाग, पाणीपुरवठा, ड्रेनेज, अतिक्रमण, निविदा, कर, आरोग्य अशा महत्त्वाच्या विभागांमध्ये सेवानिवृत्त अधिकारीच निर्णय घेत असल्याचे चित्र मनपात स्पष्टपणे दिसत आहे. तांत्रिक विभागात सलग तीन वेळा मुदतवाढ घेणारे अधिकारीही कार्यरत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

Chhatrapati Sambhajinagar
आफ्रिकेतील ज्वालामुखीचा परिणाम थेट संभाजीनगरात ! पहाटे शहरभर धुक्याचे गडद थर

खाम नदी प्रकल्पही निवृत्तांच्या भरोशावर

शहरातील महत्त्वाकांक्षी खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठीही दोन निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निधी, तांत्रिक मंजुरी आणि निविदा प्रक्रियेत या नियुक्त्यांमुळे विलंब होत असल्याची चर्चा आहे.

प्रशासन आविर्भावातची कुजबूज महापालिकेतील कार्यपद्धतीवर निवृत्त अधिकाऱ्यांचा प्रभाव वाढत चालल्याने नियमित सेवकांमध्ये असंतोष वाढला आहे. अनेक विभागांत ङ्गञ्चनिर्णय उशिरा होतातफ्फ ङ्गङ्खफाईल्स प्रलंबित राहतातफ्फ अशा तक्रारीची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. या विभागांमध्ये अनुभवाच्या नावाखाली निवृत्त अधिकाऱ्यांची मर्जी मनपा प्रशासनाकडून राखली जात असल्याची कुजबूज आहे.

सध्या मुदतवाढीवर कार्यरत अधिकारी शहर अभियंता ए. बी. देशमुख, कार्यकारी अभियंता गंगाधर भांगे, उपअभियंता वसंत निकम, पाणीपुरवठा : एम.बी. काझी, एम.ए. फालक, अतिक्रमण विभाग: संजय सुरडकर, ड्रेनेज : अख्तर सिद्दीकी, निविदा : मो. समीउलहक पटेल, अशोक साळवे, विद्युत विभाग : रवींद्र जोशी, फारूक सिद्दीकी, कर विभागाचे उपायुक्त : गणपत जाधव, खाम नदी प्रकल्प : जयवंत कुलकर्णी, असद अससोद्दीन यांच्यासह आरोग्य विभागातही दोन सेवानिवृत्त अधिकारी कार्यरत आहेत.

पारदर्शकता, कार्यक्षमतेवर टांगती तलवार

महापालिका ही नागरिकांना थेट सेवा पुरवणारी संस्था. अशा संस्थेतील महत्त्वाचे विभाग निवृत्त अधिकाऱ्यांच्या भरवशावर किती काळ चालणार? नियमित भरती कधी होणार? शासन नियमांचे पालन कसे होणार? या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत मनपा प्रशासनाची पारदर्शकता आणि कार्यक्षमता या दोन्हीवर प्रश्नचिन्हांची टांगती तलवार राहाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news