

The impact of the volcano in Africa directly affects Sambhajinagar! A dark layer of fog covers the city in the morning
मुकेश चौधरी
छत्रपती संभाजीनगर : गेल्या दोन दिवसांपासून शहरावर एकदम गारठल्यासारखी पांढरी चादर पहाटेच्या सुमारास पसरल्याचे दिसून येत आहे. त्यावरून शहरवासीयांना हे धुके असल्याचे वाटत आहे. पसर-लेल्या अंधरामुळे मंदावलेले दिवे व कमी झालेली दृश्यमानता पाहून ङ्ग वाहनचालकांना हा थंडीचा परिणाम असेल, असे वाटत आहे. मात्र हवामान तज्ज्ञांच्या निरीक्षणाचे मत शहरावासीयांना दचकवणारे ठरणारे असून, ते धुके नसून ज्वालामुखीच्या राखेचे कण आहेत. आफ्रिकेतील इथिओपियातील हायली गुब्बी येथील ज्वालामुखीचा परिणाम थेट संभाजीनगरात शुक्रवारी (दि. २८) पहाटे दिसून आला.
आफ्रिकेतील इथिओपियातील हायली गुब्बीत १२ हजार वर्षांनी ज्वालामुखीचा भीषण उद्रेक झाला आहे. सोमवारी (दि. २४) प्रचंड मोठा विस्फोट झाला. त्याच्या राखेचे ढग वातावरणात १५ किमी उंचीवर झेपावले असून, उच्चस्तरीय वाऱ्याने ही राख भारताकडे ढकलली आहे. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, जयपूर आणि पंजाब या शहरांमध्ये त्याचा अधिक परिणाम जाणवला. त्यानंतर त्याचा परिणाम थेट संभाजीनगरमध्येही दिसून आला.
शहरातील जळगाव रोड, बीड बायपास, सातारा, उस्मानपुरा रोड, जालना रोड यासह सगळीकडे पहाटे ५ ते सकाळी ८ वाजेदरम्यान धुक्यासारखा गडद थर पसरला होता. त्यामुळे रस्ते, चौक, वायपास, गल्लीबोळ सगळीकडे हे पसरल्या असल्याने धुके असल्याचे वाटले. मात्र ही धुक्याचे थर नसून, आफ्रिकेतील ज्वालामुखीच्या लहरींचा स्पर्श आज पहाटे संभाजीनगर शहरात जाणवला, असा दावा हवामान तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे.
सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
डोळ्यात जळजळ वा घश्यात कोरडेपणा जाणवल्यास लगेच मास्क वापरा, दम्याचे रुग्ण व वृद्ध नागरिकांनी पहाटे व संध्याकाळी बाहेर पडणे टाळावे. हवा कडवट किंवा धुरकट भासल्यास बाहेरील काम कमी करा, सावधगिरी बाळगा, असे आवाहान आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.