

Six new plants recorded in Marathwada, germination in Chhatrapati Sambhajinagar, Latur district
छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा, मराठवाड्यात सहा नव्या वनस्पती आढळून आल्या असून लातूर जिल्ह्यातून रामवड (Ficus mollis), नागरी (Ximenia ameri-cana) या दोन वनस्पती तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून लघु अंजीर (Ficus johannis afghanistan-ica), सरडोळ (Sterculia villosa), पापट (Pavetta indica) व अत्यंत दुर्मिळ अशा संखिनी (Blastania cerasiformis) या रान काकडी वर्गातील वेलीचा त्यात समावेश आहे.
महाराष्ट्रातील मराठवाडा भाग हा तसा शुष्क प्रदेशात गणला जाणारा प्रदेश असला तरी इथे मोजक्याच शिल्लक वनक्षेत्रात अत्यंत संपन्न जैवविविधता आढळून येते. त्यातील अनेक वृक्ष, झुडूप वा वेलींची अद्याप नोंद झालेली नाही. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील वनस्पती अभ्यासक शिवशंकर चापुले व छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद गिरधारी यांनी अलीकडेच केलेल्या अभ्यासात मराठवाड्यासाठी नव्या असलेल्या या सहा करती नदीने चाया संशोधनामुळे महराजवाडयातील समृद्ध जैवविविधतेचे नवे पैलू समोर आले आहेत. तसेच वनस्पतीशास्त्रांसाठी अभ्यासाच्या नवीन संधी निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील या वनस्पतींच्या संशोधन कार्यात उदगीर येथील निसर्गप्रमी अदिती पाटील याचेही सहकार्य लाभले आहे. बनस्पतीशास्त्रातील या नव्या संशोधनाबाद्दत शिवशंकर पापुले, मिलिंद गिरधारी आणि मोनाल जाधव यांचे या क्षेत्रातील राज्यांनी अभिनंदन केले आहे.
मराठवाडयात या नव्या वनस्पतींच्या नोंदी बायोइन्फोनेट या पेपरमध्ये शात्रीयदृष्ट्या होणे ही वनस्पतीशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण होय, नव्याने शोध लागलेल्या या वनस्पतींमध्ये सरडोळ, नागरी व पापट या वनस्पती फारच दुर्मिळ असून पर्जन्यमानात प्रचंड घट छ अभिवास नष्ट होणे, अतिशोषण या कारणामुळे त्या दुर्मिळ झाल्या आहेत, ही बाब लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील संस्थेचे प्रशांत गिरे यांनी चरीत सर्व दुर्मिळ वनस्पतीचे अधिवास बाा संवर्धन कार्य हाती घेतलेले असून ही संस्था भविष्यात वनविभागाच्या साह्याने प्रत्यक्ष अधिवासातही संवर्धन कार्य हात्ती घेणार आहे.
महाराष्ट्रातील जैवविविधता संवर्धनाचा महत्वाचा भाग म्हणून सर्व दुर्मिळ संकटग्रस्त व अती संकटग्रस्त कस्पतींचे संवर्धन कार्य करण्यासाठी आमची जनसहयोग संस्थेने व्यापक स्वरूपात कार्य हाती घेतलेले आहे, असे जनसहयोग बहुदेशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गिर यांनी सांगितले.