Somnath Suryavanshi : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी एसआयटी

परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण
Somnath Suryavanshi death case
Somnath Suryavanshi : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी एसआयटी File Photo
Published on
Updated on

Somnath Suryavanshi death case

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात, राज्य शासनाच्या निवेदनानंतर, विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी व न्या. संजय देशमुख यांनी गुरुवारी (दि. १४) पोलिस महासंचालकांना दिले.

Somnath Suryavanshi death case
President's Medal : शहर पोलिस दलातील तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

या प्रकरणी सूर्यवंशी यांच्यातर्फ बाजू मांडताना यापूवी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या, न्यायालयाने विशेष तपास पथक नियुक्त करावे, या विनंतीवरून सरकारकडून सांगण्यात आले की, यापूर्वी बदलापूर प्रकरणामध्ये सवीच्च न्यायालयाने पोलिस महासंचालकांना विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस महासंचालकांनी पथक स्थापन केले होते. या प्रकरणातही तसे सुचविण्यात येईल. यावर, खंडपीठाने पोलिस महासंचालकांना विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या यापूवीच्या आदेशानुसार पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने खंडपीठाला सांगण्यात आले. त्यावर सरकारी वकिलांनी सांगितले की, या आदेशाला सवीच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

Somnath Suryavanshi death case
HSRP Number Plate : हाय सिक्युरिटी नंबर प्लेट; 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ (पहा RTO पत्रक)

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सुधारित आदेशानुसार, या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खंडपीठात सरकारकडून निवेदन करताना सांगण्यात आले की, प्रकरणात पोलिसांचा सहभाग विचारात घेऊन प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे सोपविण्यात आलेले आहे. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून सुरू आहे. या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजया सूर्यवंशी यांनी याचिका दाखल केली असून, त्यांच्या वतीने अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी, तर राज्य शासनाकडून मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news