HSRP Number Plate : हाय सिक्युरिटी नंबर प्लेट; 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ (पहा RTO पत्रक)

वाहनधारकांना मोठा दिलासा, पण 'या' तारखेनंतर होणार कडक कारवाई
HSRP Number Plate
प्रातिनिधिक छायाचित्र (File Photo)
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP )बसवण्यासाठी अखेर मुदतवाढ देण्यात आली असून, आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र 1 डिसेंबर पासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. आता वाहनधारकांना ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतची सवलत मिळाली असली तरी, ही शेवटची संधी असल्याचे स्पष्ट संकेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) दिले आहेत.

HSRP Number Plate
HSRP number plate | एचएसआरपी नंबरप्लेटसाठी ब्रॅकेटची सक्ती

राज्यभरात वाहनांची सुरक्षा आणि ओळख प्रमाणित करण्यासाठी HSRP बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेक वाहनधारकांनी अद्याप या नियमाची पूर्तता केलेली नाही. वाहनधारकांची ही उदासीनता आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेता, शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

HSRP Number Plate
HSRP : ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ म्‍हणजे काय ? जाणून घ्या त्‍याचे फायदे
Attachment
PDF
HSRP 30.11.2025 LETTER
Preview

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे 7 लाखापेक्षा ही जास्त वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी नंबर पलेट्साठी नोंदणीही केली नव्हती. आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिली असून 30 तारीख ही चौथी वेळ मुदतवाढ राहणार आहे. यानंतर मात्र मुदतवाढ मिळणार नसून 1 डिसेंबर पासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. १ डिसेंबर २०२५ पासून HSRP नसलेल्या वाहनांवर कडक कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल असेही विभागाने काढलेल्‍या परिपत्रकात म्‍हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news