सिल्लोड : गणांवर भाजप तर गटांवर शिवसेनेचे वर्चस्व

सिंह आला, गड गेला अशी शिंदे सेनेची अवस्था; दिग्गजांनी राखले गड
BJP ShivSena
BJP ShivSenaPudhari
Published on
Updated on

sillod zp election bjp shinde faction shivsena win

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुका जिल्हा परिषद ९ गट व पंचायत समितीच्या १८ गणांसाठी झालेल्या मतमोजणीत जिल्हा परिषद गटांमध्ये शिवसेना शिंदे गटाने ६ गटांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर भाजपाने ३ गट जिंकले. मात्र पंचायत समिती गणांमध्ये भाजपाने १० जागा पटकावत पंचायत समितीवर ताबा मिळविला, तर शिवसेना शिंदे गटाला ८ जागांवर समाधान मानावे लागले.

BJP ShivSena
जि. प. मध्ये एमआयएमची हवा गुल

त्यामुळे जिल्हा परिषदेत वरचढ ठरलेली शिवसेना शिंदे पंचायत समितीच्या सत्त्-ोपासून मात्र दूर राहिली. केहऱ्हाळा गटात शिवसेनेच्या उमेदवाराने केलेल्या फेरमतमोजणीच्या मागणीनंतरही निकालात कोणताही बदल झाला नाही. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार यांच्या हस्ते निवड प्रमाणपत्रे देण्यात आली.

शिवसेना शिंदे गटाने अजिंठा, अंभई, शिवना, डोंगरगाव, घाटनांद्रा व अंधारी हे जिल्हा परिषद गट जिंकून धनुष्यबाणाचा भगवा उंचावला, तर भाजपाने उंडणगाव, भराडी व केहऱ्हाळा गटांवर आपला झेंडा फडकावला. पंचायत समिती गणांमध्ये शिवसेना शिंदे गटाने अजिंठा, शिवना, अंभई, घाटनांद्रा, आमठाणा, अंधारी, डोंगरगाव व पळशी या ८ गणांत विजय मिळविला, तर भाजपाने पानवडोद, हळदा, उंडणगाव, हट्टी, पालोद, भराडी, धानोरा, केहऱ्हाळा, केळगाव व निल्लोड या १० गणांत बाजी मारत पंचायत समितीवर कमळ फुलविले.

BJP ShivSena
आघाडी-पिछाडीच्या खेळात समर्थकांची धावपळ

मतमोजणीदरम्यान आयटीआय परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. समर्थक, पदाधिकारी व सामान्य नागरिक निकाल ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीपासून जिल्हा परिषद गटांचे निकाल शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने लागत असतानाच पंचायत समिती गणांत मात्र प्रत्येक फेरीत चढाओढीचे चित्र दिसून आले. अटीतटीच्या या लढतीत भाजपाने शेवटी बाजी मारली.

या निवडणुकीत अनेक गट व गणांत प्रतिष्ठेची लढाई रंगली. आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल आमेर यांनी अंभई गटातून विजय मिळविला. सुरेश बनकर यांच्या पत्नी अनिता बनकर यांनी पंचायत समितीत विजय मिळविला. जि. प. माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे यांच्या पत्नी मंगला तायडे यांनी अंधारी गटातून दुसऱ्यांदा विजय मिळविला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे यांच्या पत्नी अशा अर्जुन गाढे यांनी घाटनांद्रा गटात बाजी मारली. सहकार महर्षी माणिकराव दादासाहेब पालोदकर यांचे पुत्र देविदासराव पालोदकर यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून जि. प. सभागृहात प्रवेश केला आहे. केहऱ्हाळा गटातून भाजपाच्या अनिता ज्ञानेश्वर मोठे यांनी अवघ्या १३१ मतांनी निसटता विजय मिळवला.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे व पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news