Sillod News : सिल्लोडला भाजपकडून पालावरील कुटुंबांना फराळाचे वाटप

शहरालगत पालावर राहणाऱ्या कुटुंबांची भेट घेत भाजप पदाधिकाऱ्यांनी रविवारी (दि. ८) 'पालावरची दिवाळी' हा उपक्रम राबविला.
Sillod News
Sillod News : सिल्लोडला भाजपकडून पालावरील कुटुंबांना फराळाचे वाटपfile photo
Published on: 
Updated on: 

Sillod News : Sillod distributed snacks to families on pala from BJP

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : शहरालगत पालावर राहणाऱ्या कुटुंबांची भेट घेत भाजप पदाधिकाऱ्यांनी रविवारी (दि. ८) 'पालावरची दिवाळी' हा उपक्रम राबविला. यावेळी कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्यांच्याशी संवाद साधत सुख-दुःख जाणून घेण्यात आले.

Sillod News
Deepotsav 2026 : दीपोत्सवाला जल्लोषात प्रारंभ

यंदा दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, पालावर राहणाऱ्या कुटुंबांनाही दिवाळीचा आनंद घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन भाजपने हा सामाजिक उपक्रम राबविला. समाजातील वंचित घटकांपर्यंत सणाचा आनंद पोहोचवणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, हा उपक्रमाचा उद्देश असल्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर व जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे यांनी सांगितले.

Sillod News
Investment Fraud : फेसबुकवरील शेअर मार्केट गुंतवणुकीच्या जाहिरातीला भुलले

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, नगरसेवक स्वप्नील शिनगारे, मनोज मोरेल्लू, अमोल कुलकर्णी, साळवे आदी उपस्थित होते. दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नसून माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा उत्सव आहे.

वंचित व गरजू घटकांसोबत आनंदाचे क्षण वाटून घेणे, हीच खऱ्या अर्थाने दिवाळीची शिकवण आहे. असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.