Investment Fraud : फेसबुकवरील शेअर मार्केट गुंतवणुकीच्या जाहिरातीला भुलले

सेवानिवृत्ताला १ कोटींचा गंडा; बोगस ॲपवर दाखवला साडेचार कोटींचा आभासी नफा
Investment Fraud
Investment Fraud : फेसबुकवरील शेअर मार्केट गुंतवणुकीच्या जाहिरातीला भुललेfile photo
Published on: 
Updated on: 

Misled by stock market investment ads on Facebook

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शेअर बाजारात अल्पावधीत प्रचंड नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठाला तब्बल १ कोटी ७ लाख ४५ हजार २२७ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. फेसबुकवरील जाहिरातीच्या माध्यमातून जाळ्यात ओढून, बोगस ट्रेडिंग अॅपवर तब्बल साडेचार कोटी रुपयांचा खोटा नफा दाखवून ही लूट करण्यात आली. आयुष्यभराच्या नोकरीतील कष्टाची जमापुंजी गमावल्यानंतर, नफ्यातील पैसे काढण्यासाठी १५ टक्के कमिशन म्हणून पुन्हा २५ लाखांची मागणी करून तीही उकळण्यात आली. हा प्रकार ३० सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान सिडको एन ४ भागात घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Investment Fraud
FDA License Suspension : मधुर मिलन मिठाईसह चार आस्थापनांना टाळे

खाजगी नोकरीतून सेवानिवृत्त झालेले ७३ वर्षीय फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, ते कुटुंबाच्या भविष्यातील गरजांसाठी बचतीची रक्कम सुरक्षित ठिकाणी गुंतवण्याच्या विचारात होते. ३० सप्टेंबर २०२६ रोजी फेसबुक वापरत असताना त्यांना 'इक्विरस ईयूआर एचएनआय' या शेअर मार्केट गुंतवणूक योजनेची एक आकर्षक जाहिरात दिसली. त्यांनी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना दिव्या अय्यर नावाच्या महिलेने मोबाईलवरून संपर्क साधला.

शेअर बाजारातील गुंतवणुकीवर मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिने ज्येष्ठाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर बनावट ट्रेडिंग अॅप आणि शेअर्सच्या खरेदी-विक्रीच्या टिप्स व सूचना मिळण्यासाठी सिग्नल मेसेजिंग अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. सिग्नल अॅपवर वेळोवेळी येणाऱ्या मेसेज व सल्ल्यांनुसार फिर्यादी यांनी संबंधित अॅपवर शेअर्सची खरेदी-विक्री सुरू केली. या बनावट अॅपवर काही दिवसांतच त्यांची मूळ गुंतवणूक आणि त्यावर झालेला नफा मिळून एकूण ५ कोटी ५२ लाख २० हजार ५६३ रुपये इतकी प्रचंड रक्कम शिल्लक असल्याचे भासवण्यात आले. यात तब्बल ४ कोटी ५० लाख ४५ हजार ५३५ रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे स्क्रीनवर दिसत असल्याने फिर्यादीचा योजनेवर पूर्ण विश्वास बसला.

Investment Fraud
Sambhajinagar News : शहागंजमध्ये प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला भीषण आग

महिनाभरात ८ खात्यांवर पाठवले १ कोटी ७ लाख

नफ्याची आकडेवारी पाहून भामट्यांनी फिर्यादीला अधिक शेअर्स खरेदी करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी त्यांच्या अदालत रोडवरील अॅक्सिस बँकेच्या खात्यातून ३० सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आरटीजीएस व एनइएफटीद्वारे विविध बँकांतील अनोळखी खात्यांवर कोट्यवधी रुपये वळवले. यामध्ये सेंट्रल बँकेच्या गच्चीबावली, विष्णुपूरी, डभारा या बँकेच्या शाखांमध्ये तसेच उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, नवी दिल्ली, कॅनरा बँक, नऊगया शाखा या सायबर भामट्याने दिलेल्या बँक खात्यावर १ कोटी ७ लाख ४५ हजार २२७ रुपये भरले गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.