Sillod mass marriage Muslim community : इज्तेमाई शादियाँचा आदर्श : १५५ जणांचा सामूहिक निकाह

वर्षभरात विविध ठिकाणच्या आयोजनातून ५५५ सामूहिक विवाहाचा टप्पा पूर्ण
Sillod mass marriage Muslim community
मुस्लिम सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला.pudhari photo
Published on
Updated on

सिल्लोड : अनावश्यक खर्चाला लगाम घालत साधे-पणातून सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा इज्तेमाई शादियाँ (मुस्लिम सामूहिक विवाह सोहळा) सिल्लोड येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात तब्बल १५५ जणांचा निकाह संपन्न झाला.

वर्षभरात विविध ठिकाणच्या आयोजनातून ५५५ सामूहिक विवाहाचा टप्पा पूर्ण केला असून पुढील वर्षी शहरात विक्रमी सामूहिक विवाह सोहळा संपन्न करण्याचा आयोजकांचा मानस असून, आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून गेल्या सुमारे २५ वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम आज समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Sillod mass marriage Muslim community
Rohit Pawar | पायलटच्या मदतीने अजित पवारांचा घातपात; रोहित पवारांचा आरोप

या मंगल प्रसंगी आमदार अब्दुल सत्तार, अक्कलकुवा येथील मौलाना हुजेफा वस्तानवी, मौलाना मोहम्मद नसीम, नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, मेडिकल कॉलेजचे संचालक तथा जि.प. सदस्य अब्दुल आमेर, निवृत्त जिल्हा निबंधक तथा जीप सदस्य देविदासराव पालोदकर, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे,माजी उपसभापती सय्यद अजिज बागवान, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, प्रशासकीय अधिकारी रईस खान, माजी चेअरमन रामदास पालोदकर, सत्तार बागवान, नगरसेवक डॉ. फिरोज खान, रऊफ बागवान, सिद्धेश्वर आहेर आदींनी आशीर्वाद दिले.

तसेच आसिफ बागवान, शेख इम्रान गुड्डू, जुम्माखा पठाण, विशाल जाधव, अकिल वसईकर, बबलू पठाण, मिझी चांदबेग, सत्तार हुसेन, शेख बावर, बाजार समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे, देविदास लोखंडे, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विनोद मंडलेचा, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, प्रताप प्रशाद, मधुकर गवळी, राजेंद्र ठोंबरे, संजय डमाळे, अक्षय मगर आदी मान्यवरांनीही उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले.

आ. अब्दुल सत्तार यांनीही सध्याच्या परिस्थितीत सामूहिक विवाहाची गरज अधोरेखित करत, लग्नसमारंभातील अवाजवी खचर्चामुळे कर्जबाजारीपणा वाढतो. हा अपव्यय टाळून प्रत्येक समाजाने सामूहिक विवाहाची कास धरली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

Sillod mass marriage Muslim community
भाजपातील बहुसंख्य 'बंडोबांना थंडोबा करण्यात नेत्यांना यश!'

समाजाच्या उन्नतीचा पाया

मौलाना हुजेफा वस्तानवी यांनी आपल्या मार्गदर्शनात सामूहिक विवाह ही केवळ परंपरा नसून समाजाच्या उन्नतीचा पाया असल्याचे स्पष्ट केले. आदर्श एज्युकेशन सोसायटी व आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात नवदाम्पत्यांना संसारोपयोगी साहित्य देण्यात आले, तसेच पाहुण्यांसाठी आदरातिथ्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली. या सोहळ्यास सहकार्य करणाऱ्या सर्व समाजबांधव, पदाधिकारी, स्वयंसेवक, पाहुणे व नवदाम्पत्यांच्या नातेवाईकांचे नगराध्यक्ष तथा आदर्श एज्युकेशन सोसायटीचे सचिव अब्दुल समीर यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news