Sambhajinagar Crime : घातक रसायनाचे साडेचारशे ड्रम पकडले

सिल्लोड ग्रामीण पोलिसांची कारवाई, आरोपींची संख्या पाच
Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crimepudhari photo
Published on
Updated on

सिल्लोड : घातक रसायनाचे साडेचारशे ड्रम पोलिसांनी पकडले. तर पोलिसांनी अजून दोन आरोपींना ताब्यात घेतल्याने घातक रसायन प्रकरणातील आरोपींची संख्या वाढून पाच झाली आहे. ताब्यातील आरोपी पोलिस कोठडीत असून, यातील अजून पाच आरोपी निष्पन्न झाल्याचे कळते.

तालुक्यातील पळशी येथील पिरखोरा परिसरात घातक रसायनाचे बावीस ड्रम बुधवारी रात्री (दि.१) अज्ञातांनी फेकून देत पेटवून दिले होते. तर रसायनाच्या दुर्गंधीमुळे गुरुवारी (दि.२) दुपारी सदर प्रकार समोर आला होता. माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व ही माहिती तहसीलदार, प्रदूषण विभागाला दिली होती. तर शुक्रवारी (दि.३) महाराष्ट्र प्रदूषण नियमक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करीत तपासणीसाठी नमुने घेतले होते.

Sambhajinagar Crime
Sillod News : पळशी शिवारात अज्ञातांनी घातक रसायनाचे ड्रम फेकले

पोलिसांनी या घटनेचा तपास करीत या प्रकरणी तीन दिवसांपूर्वी तिघांना ताब्यात घेतले होते. तर आरोपींकडून माहिती काढत पोलिसांनी पुन्हा दोघांना ताब्यात घेतले. तर सिल्लोड शहर परिसरात घातक रसायनाचे तब्बल साडेचारशे ड्रम पकडून जप्त केल्याचे वृत्त आहे.

या प्रकरणातील अजून चार-पाच आरोपी निष्पन्न झाले असून, आरोपींची संख्या वाढणार आहे. घातक रसायन आणले कोठून ? याचा मुख्य सूत्रधार कोण ? याचा ग्रामीण पोलिस कसून शोध घेत आहेत.

Sambhajinagar Crime
Sillod News : घातक रसायनाचे दीड हजार ड्रम विविध जंगलात फेकले

ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, बीट जमादार दादाराव पवार, राजेंद्र काकडे, संजय आगे यांना गोपनीय माहिती व तांत्रिक बाजूंच्या तपासा आधारे पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. तर या घटनेच्या तपासाची गोपनीयता पोलिसांकडून पाळली जाते असल्याने आरोपींची नावे गोपीनाथ ठेवण्यात येत आहेत. यापूर्वी सिल्लोड शहरातील दोन व तालुक्यातील उपळी येथील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या गांभीर्याने पर्दाफाश

घातक रसायनप्रकरणी यापूर्वी सोयगाव तालुक्यातील फर्दापूर, जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत, मात्र सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी या घटनेला गांभीर्याने घेत गुन्हा दाखल होण्याआधीच या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. तर काही आरोपीही निष्पन्न केले होते. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले. शिवाय साडेपाचशे घातक रसायनाचे ड्रमही पकडले. ग्रामीण पोलिसांच्या गांभीर्यामुळे या घटनेचा पर्दाफाश झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news