Sillod News : पळशी शिवारात अज्ञातांनी घातक रसायनाचे ड्रम फेकले

सिल्लोड : रसायन पेटवल्याने दुर्गंधी, पोलिसांकडून पाहणी
Sillod News
Sillod News : पळशी शिवारात अज्ञातांनी घातक रसायनाचे ड्रम फेकलेfile photo
Published on
Updated on

Sillod News: Unknown persons threw drums of hazardous chemicals in Palashi Shivara

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पळशी येथील पिरखोरा परिसरात अज्ञातांनी घातक रसायनाचे बावीस ड्रम निर्जनस्थळी आणून फेकून दिले व पेटवून पसार झाले. तर रसायनाच्या दुर्गंधी परिसरात पसरल्याचा गुरुवारी (दि.२) दुपारी प्रकार समोर आला. माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी धाव घेत पाहणी केली.

Sillod News
Latur Rain : लातूर जिल्ह्यात अखेर वरुणराजाचे आगमन

पिरखोरा परिसरात खडकाळ जमीन आहे. हा परिसर निर्जनस्थळ असल्याने बुधवारी रात्री अज्ञातांनी वाहनातून घातक रसायनचे २२ ड्रम आणून फेकले. यानंतर घातक रसायन पेटवून अज्ञात वाहनातून पसार झाले. दुपारी रसायनच्या धुराचा दुर्गंध वास परिसरात पसरला. काही शेतकऱ्यांनी जाऊन पाहिले व ही माहिती पोलिस पाटील व पोलिसांनी दिली. माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, बीट जमादार दादाराव पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व ही माहिती तहसीलदार, प्रदूषण विभागला दिली.

दरम्यान ड्रममधील काही घातक रसायन जळत होते. तर काही रसायन एका पाझर तलावाकडे वाहत होते. मात्र पोलिसांनी पोलिस पाटील सुदाम जैवळ, पुंडलिक राकडे व शेतकऱ्यांच्या मदत घेत जेसीपीच्या साह्याने वाहत असलेले रसायन आडवले. या घातक रसायनाच्या दुर्गंधीने शेजारील शेतकरी घटनास्थळी जमले होते. हे घातक रसायन कुणी व का टाकले ? याचा शोध ग्रामीण पोलिस घेत आहे. तर प्रदूषण विभागाच्या पाहणीनंतर या घातक रसायनाचा उलगडा होईल.

Sillod News
Drugs mafia : अश्पाकची भरचौकात धिंड

दरम्यान हे घातक रसायन पाझर तलावात गेले असते तर पाणी दूषित झाले असते. याचा परिणाम वन्यजीव, पर्यावरणासह मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तर घातक रसायनिक धुराचा परिसरातील शेतकऱ्यांना दिवसभर त्रास सहन करावा लागला असून, याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मोठे रॅकेट असण्याची शक्यता

फेकलेले घातक रसायन कालबाह्य असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंधरादिवसांपूर्वी खांदेशमधील तोंडापूर (जामनेर) परिसरात असेच घातक रसायनाचे ड्रम आणून फेकले होते. रसायनाला लावलेल्या आगीतील धुरामुळे नागरिकांना गुदमरल्यासारखे होणे, डोळ्यांची आग होणे, असा त्रास जाणवला होता. तर आता पुन्हा हा प्रकार समोर आला आहे. प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news