Chhatrapati Sambhajinagar Crime : श्रेयश कॉलेजमध्ये राडा; सत्र परीक्षेला बसू न दिल्याने विभागप्रमुखावर हल्ला

सातारा ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crime pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : सत्र परीक्षेला बसून दिल्याच्या रागातून संगणकशास्त्र विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी बाहेरच्या तरुणांना सोबत आणून विभागप्रमुखावर फायटरने हल्ला केला. श्रेयश कॉलेजच्या प्राचार्यांच्या केबिनमध्येच घडलेल्या या घटनेत विभागप्रमुखाच्या उजव्या हाताची करंगळी फॅक्चर झाली असून, तक्रार दिली तर पार्सल करून तुझ्या राज्यात पाठवू, अशी धमकीही देण्यात आली. हा प्रकार सोमवारी (दि. २३) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी सातारा ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळ कर्नाटक येथील विजयकुमार एम. पी. (३४, रा. सिडको एन-१) हे श्रेयश कॉलेजमध्ये विभागप्रमुख आहेत. १७ नोव्हेंबर रोजी विद्यार्थी बालाजी राठोड (२०), विजय चव्हाण (२०), ओमकार डंक (२०) आणि चेतन व्यवहारे (२०) यांनी परीक्षेला बसू देण्याची मागणी करत त्यांना बाहेर बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर २१ नोव्हेंबरला ऋषिकेश बंजारा (२१) व बालाजी राठोडसह इतरांनी प्राचार्य बी. एम. पाटील यांच्या केबिनमध्ये घुसून विभागप्रमुखांना कामावरून काढण्याची मागणी करत गोंधळ घातला.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Sambhajinagar Water Scarcity : टँकरच्या उंबरठ्यावर ३५ गावे ८१ गाव-तांड्यांवर पाणीबाणी

सोमवारी दुपारी प्राचार्यांनी विजयकुमार यांना केबिनमध्ये बोलावले असता तेथे आरोपींसह सचिन राठोड (३०), मुकेश राठोड (३५), ओम पवार (२१) आणि रोहित पवार (२०) हजर होते. विजयकुमार हिंदीतून बाजू मांडत असताना महाराष्ट्रात राहून हिंदीत का बोलतो? असे म्हणत सचिन व मुकेश राठोड यांनी त्यांना मारहाण करत फरशीवर आदळले. फायटरने वार केल्याने त्यांच्या करंगळीचे हाड मोडले, तर मानेला व कपाळाला मार लागला. सुरक्षा रक्षकांनी त्यांची सुटका केली. पुढील तपास उपनिरीक्षक दिलीप बच्छाटे करत आहेत.

व्हिडीओ व्हायरल

प्रा. विजयकुमार यांनी खुर्चीवरून उठून थेट एका तरुणाला लाथ मारली. तेव्हा त्याने त्यांचा पाय धरून ओढला आणि तेथील तीन ते चार जणांनी विजयकुमार यांना खाली पाडून बेदम मारहाण केली. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Nanded Crime : ११ दिवसांत १ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.