Sambhajinagar Water Scarcity : टँकरच्या उंबरठ्यावर ३५ गावे ८१ गाव-तांड्यांवर पाणीबाणी

दुष्काळ : १ लाख १८ हजार लोकसंख्येसमोर भीषण जलसंकट
Sambhajinagar Water Scarcity
खुलताबाद शहरसह तालुक्यातील अनेक गावांची तहान भागवणाऱ्या गिरिजा मध्यम प्रकल्पात एकूण १३.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक असला तरी, प्रत्यक्ष पिण्यासाठी उपलब्ध असलेला जिवंत पाणीसाठा केवळ ३.१६ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे.pudhari photo
Published on: 
Updated on: 

सुनील मरकड

खुलताबाद : खुलताबाद तालुक्यातील पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होऊ लागले आहे. पाझर तलाव, विहिरी आणि प्रमुख जलप्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने खालावत असल्याने येत्या १० ते १५ दिवसांत तालुक्यातील तब्बल ३० ते ३५ गावांमधून पाणीटँकर आणि खासगी विहीर अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल होण्याची शक्यता प्रशासकीय पातळीवर वर्तवली जात आहे. यामुळे तालुक्यातील सुमारे १ लाख १८ हजार लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

तालुक्यात एकूण ४० ग्रामपंचायती असून, त्याअंतर्गत गावे, तांडे आणि वस्त्या मिळून सुमारे ८१ गावांचा समावेश होतो. यातील अनेक गावांमधील पारंपरिक जलस्रोतांनी आताच तळ गाठला आहे.

Sambhajinagar Water Scarcity
Nanded Sand Mining Raid : गोदावरी पात्रातील अवैध रेती उपशावर नांदेड पोलिसांची धडक कारवाई

पाण्याअभावी शेतीची पिके करपू लागली आहेत. परिणामी, पशुधनासाठी आवश्यक असलेल्या हिरव्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. विहीर अधिग्रहण आणि चारा छावण्यांची मागणी जोर धरू लागली. जलप्रकल्पांतील खालावलेला पाणीसाठा चिंतेचा विषय तालुक्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या प्रमुख मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

गिरिजा मध्यम प्रकल्पात एकूण १३.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक असला तरी, प्रत्यक्ष पिण्यासाठी उपलब्ध असलेला जिवंत पाणीसाठा केवळ ३.१६ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. तर सोबलगाव लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडला आहे.

जलप्रकल्पांमधील सद्यस्थितीतील पाणीसाठा

गिरिजा मध्यम प्रकल्पः १३.२८ टक्के (जिवंत साठा केवळ ३.१६ टक्के) गोंदेश्वर लघु प्रकल्पः २३.२८ टक्के निरगुडी लघु प्रकल्पः ८९.०३ टक्केराजेराय टाकळी लघु प्रकल्पः ५५.९२ टक्केलोणी लघु प्रकल्पः १७.९१ टक्केमावसाळा रंगमहाल तलावः २० टक्केसोबलगाव लघु प्रकल्पः शून्य टक्के (पूर्णपणे कोरडा)

Sambhajinagar Water Scarcity
Nanded Crime : ११ दिवसांत १ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

शिल्लक पाणीसाठा वाचवण्यासाठी कारवाईची गरज

निरगुडी आणि राजेराय टाकळी या दोन लघु प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठा वगळता इतर सर्व प्रकल्पांची स्थिती बिकट आहे. उरलेला हा पाणीसाठा केवळ पिण्यासाठी राखून ठेवणे अत्यावश्यक बनले आहे. मात्र, अनेक प्रकल्पांतून आणि नदीपात्रातून रात्री-बेरात्री विद्युत मोटारींच्या साहाय्याने अवैध पाणी उपसा सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. लघु प्रकल्पांतील पाणीसाठा वाचवण्यासाठी कारवाई होणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.