Nanded Crime : ११ दिवसांत १ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांची अमली पदार्थांविरोधात धडक मोहीम; ७९ गुन्हे दाखल
 Crime
Crimepudhari photo
Published on: 
Updated on: 

नांदेड : तरुण पिढीला नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी नांदेड पोलिसांनी सुरू केलेल्या 'नशेला स्टाॅप, भविष्याला स्टार्ट!' या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या पुढाकाराने ११ ते २१ नोव्हेंबर या ११ दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात धडक कारवाई करत ७९ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ कोटी १३ लाख ९० हजार ५०० रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन करणाऱ्यांविरोधात स्थानिक पोलिस ठाणी व स्थानिक गुन्हे शाखेने ही संयुक्त मोहीम राबवली. अंमली पदार्थांची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. यामध्ये माहूर पोलिसांनी एका गुन्ह्यात ६० लाख २२ हजार ५०० रुपये, स्थानिक गुन्हे शाखेने किनवट आणि माहूर भागात दोन गुन्ह्यांत ५३ लाख ३८ हजार रुपये, तर कुंटूर पोलिसांनी एका गुन्ह्यात ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 Crime
Tushar Rathod Extortion Case : आ. तुषार राठोड यांना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी नागपुरातून जेरबंद

अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध जिल्हाभरात ७५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक गुन्हे इतवारा (८), विमानतळ (७) आणि नांदेड ग्रामीण (७) पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल झाले. तसेच वजीराबाद, शिवाजीनगर, सोनखेड (प्रत्येकी ५), देगलूर, नायगाव, भोकर, तामसा आणि स्थानिक गुन्हे शाखा (प्रत्येकी ४), भाग्यनगर, लोहा, बिलोली (प्रत्येकी ३), कंधार, अर्धापूर, कुंडलवाडी (प्रत्येकी २) आणि लिंबगाव, रामतीर्थ, हिमायतनगर येथे प्रत्येकी १ गुन्हा दाखल झाला आहे.

 Crime
Nilwande Dam Water Supply: निळवंडे धरणाचे पाणी आणखी तीन गावांना मिळणार; आमदार आशुतोष काळेंच्या सूचनेनंतर उपाययोजनांना वेग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.