मका उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम मिळेना

बंद असलेली ऑनलाईन खरेदी नोंदणी सुरू करण्याची मागणी
sambhajinagar news
मका उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम मिळेनाfile photo
Published on
Updated on

Maize farmers did not receive payment

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मका उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या मका खरेदीचे अद्यापही शेतकऱ्यांना पेमेंट मिळालेले नाही. याबाबत उबाठाचे तालुका संघटक डॉ. अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

sambhajinagar news
Sambhajinagar News : दबंग नगरसेवक आयुक्तांच्या रडारवर

तालुक्यात आतापर्यंत १० हजार - क्विटल मका खरेदी करण्यात आली आहे. मात्र, खरेदीनंतर एक महिना उलटूनही खात्यावर रक्कम जमा झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. खरेदी केलेल्या मक्याचे पैसे तत्काळ वितरित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, नवीन मका खरेदीसाठीची ऑनलाईन नोंदणी सध्या बंद असून ती तत्काळ सुरू करावी, अशीही मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. तसेच करंजखेड़ा मका खरेदी केंद्र वगळता इतर केंद्रे उद्दिष्ट कमी असल्याने बंद ठेवण्यात आली आहेत, यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे यात म्हटले आहे.

sambhajinagar news
ऑनलाईन नोंदणी हजारोंची; खरेदी मात्र अपुरी

शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की तालुक्यातील सर्व मका खरेदी केंद्रांना प्रत्येकी ५० हजार क्विटलचे उद्दिष्ट देण्यात यावे. तसेच, तातडीने केंद्रनिहाय किमान ५ हजार क्विटलचे उद्दिष्ट देऊन खरेदी सुरू ठेवावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मका खरेदीचे अद्यापही शेतकऱ्यांना पेमेंट मिळालेले नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. हा प्रश्न त्वरीत सोडविण्याची आवश्यकता असल्याचे नि-वेदनात म्हटले आहे.

या सर्व मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास, २ मार्चपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनावर डॉ अण्णा शिंदे, दीपक बोडखे, गोकुळ गोरे यांच्यासह इतर अनेक शेतकऱ्यांच्या आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news