Accident News : कारला भरधाव वाहनाची धडक; एक ठार, दोन जखमी

कारला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार, तर दोन जण जखमी झाले.
sillod news
कारला भरधाव वाहनाची धडक; एक ठार, दोन जखमीfile photo
Published on
Updated on

Car hit by speeding vehicle; One dead, two injured

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : कारला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार, तर दोन जण जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि. १५) रात्री साडे आठच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर- जळगाव महामार्गावरील माणिकनगर जवळील हॉटेल राहुल समोर घडला.

sillod news
ऑनलाईन नोंदणी हजारोंची; खरेदी मात्र अपुरी

सीताराम देवराव पालोदकर (६०, रा. पालोद) असे मृताचे तर सुरेश हिंगमिरे (३५), ईश्वर सुरडकर (३१, दोघे रा. पालोद ) अशी जखमींची नावे आहेत.

वरील तिघे कारमधून ((एमएम १७ टी- १३८५) माणिकनगरकडून सिल्लोडकडे जात होते. या दरम्यान हॉटेल राहुलजवळ पाठीमागून येणाऱ्या अज्ञात भरघाव वाहनाने धडक दिल्याने तिघे जखमी झाले.

sillod news
मका उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम मिळेना

अपघात होताच नागरिकांनी धाव घेत गंभीर जखमी सीताराम पालोदकर यांना रुग्णालयात नेले. मात्र त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. या अपघातात कारच्या एका भागाचा अक्षरशः चुराडा झाला.

या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आ-लेली असून पुढील तपास बीट जमादार दीपक इंगळे करीत आहेत. दरम्यान, मृतावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news