Shivji Maharaj Janmotsav celebration sambhajinagar
शिवजन्मोत्सव सोहळ्याने अवघे शहर शिवमय...file photo

शिवजन्मोत्सव सोहळ्याने अवघे शहर शिवमय...

आसमंत दुमदुमले ! पारंपरिक वाद्य, वेशभूषेत मध्यरात्रीपासूनच शिवभक्तांचा अखंड जल्लोष
Published on

Shivji Maharaj Janmotsav celebration sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंतस... छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय अशा अखंड चोषणांसह आकाशात दिमाखात फडकणारे भगवे ध्वज, वाद्यांचा दणदणाट आणि पारंपरिक वेशभूषेत तसेच शिवरायांच्या रूपात सहभागी चिमुकल्यांसह आबालवृ‌द्धांच्या अलोट गर्दीच्या साक्षीने गुरुवारी (दि.१९) शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Shivji Maharaj Janmotsav celebration sambhajinagar
'खाम' पॅटर्नवर सुखना नदीचेही होणार पुनर्जीवन

यानिमित्त आकर्षक विद्युत री पणाईने क्रांती चौक परिसर उजळला, बुधवारी मध्यरात्रीपासूनच गोवाडे, शिवकथा आणि वाद्यांच्या तालावर मनसोक्त शिरकत शिवप्रेमी तरुणाईचा जल्लोष आणि छत्रपतीच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला, क्रांती चौकातील शिवरायांच्या ५५ फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच शिवप्रेमींनी मोठी गर्दी उसळली. तत्पूर्वी सकाळी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, राज्याचे मंत्री अतुल सावे, खा. भागवत कराड, आ. संजय केणेकर, महापौर समीर राजुरकर, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, महोत्सव समितीचे अध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. समितीच्या वतीने स्वागत समारोह पार पडला.

थानंतर विविध राजकीय पक्षांचे नेतेमंडळी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते न शिवप्रेमींनी क्रांती चौकात अभिवादनासाठी गर्दी केली. वाहन रैली, मशाल रॅली, दिडी, मिरवणुकांव्दारे दिवसभर क्रांती चौक शिवप्रेमींच्या गर्दनि गजबजून गेला, शिवरायांना बंदन करण्यासाठी सायंकाळी ५ वाजेनंतर शिवप्रेमी आबालवृद्धांची अलोट गर्दी उसळली. रात्री उशिरापर्यंत क्रांती चौकासह शहरात शिवजन्मोत्सवाचा जल्लोष सुरू होता.

Shivji Maharaj Janmotsav celebration sambhajinagar
Bees Attack : अजिंठा लेणीत सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला

मध्यरात्रीच शिवजन्मोत्सवाला सुरुवात

जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला बुधवारी सायंकाळी क्रांती चौकात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर पोवाडा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी क्रांती चौकात शिवजन्मोत्सवाचा जागर करण्यात आला. यावेळी हजारो शिवप्रेमींची येथे गर्दी जमली होती. मध्यरात्री १२ वाजता फटाक्यांची आतषवाजी करून शिवरायांचा जयजयकार करत शिवजन्मोत्सवास सुरुवात झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news