'खाम' पॅटर्नवर सुखना नदीचेही होणार पुनर्जीवन

अर्धा किलोमीटरचे काम पूर्ण, नदीपात्र होणार प्रदूषणमुक्त
sambhajinagar news
'खाम' पॅटर्नवर सुखना नदीचेही होणार पुनर्जीवनfile photo
Published on
Updated on

Sukhna River will also be revived on the 'Kham' pattern

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराचे वैभव असलेल्या खाम नदीच्या यशस्वी पुनर्जीवनानंतर आता महापालिका प्रशासनाने 'सुखना' नदीचे रूप पालटण्यासाठी कंबर कसली आहे. खाम नदीच्या धर्तीवरच सुखना नदीचे सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी तत्काळ रोखून पात्र शुद्ध करण्याचे आदेश महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी बुधवारी (दि. १८) दिले.

sambhajinagar news
नेपाळपर्यंत गुंगारा देणारा ड्रग्ज माफिया अश्पाक पटेल नाशिकमध्ये जेरबंद

सुमारे वर्षभरापूर्वी आयुक्तांच्या संकल्पनेतून सुखना नदी पुनर्जीवन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. बुधवारी आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामाचा आढावा घेतला. सध्या चिकलठाणा स्मशानभूमी ते एअरप-ोर्टच्या मागील बाजूचा पूल या सुमारे अर्धा किलोमीटर अंतराचे खोलीकरण, रुंदीकरण आणि रॉक पिचिंगचे काम पूर्ण झाले आहे. या कामाच्या दर्जाबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.

पुढील टप्प्याला गती

हा प्रकल्प आता वेगाने पुढे नेण्यात येणार आहे. यामध्ये चिकलठाणा मार्केट ते मिनी घाटी (जिल्हा रुग्णालय) या टप्प्यातील काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पाहणी दौऱ्यात शहर अभियंता संजय कोंबडे, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, उद्यान विभागाच्या अभियंता स्वप्नाली माने आणि सुखना नदी पुनर्विकास प्रकल्पाचे विशेष कार्य अधिकारी जयवंत कुलकर्णी उपस्थित होते.

sambhajinagar news
जि. प. च्या नावाने बनावट भरती आदेशांचा सुळसुळाट

सांडपाणी ड्रेनेजलाईनला जोडणार

पूर्वी या परिसरात ड्रेनेजची सुविधा नव्हती, त्यामुळे अनेक ठिकाणचे सांडपाणी थेट नदीत सोडले जात होते. मात्र, आता महापालिकेकडून नवीन ड्रेनेज सिस्टिम विकसित करण्यात येत आहे. खाम नदीप्रमाणेच येथील उघड्या ड्रेनेज बंद करून सांडपाणी मुख्य ड्रेनेज पाईपलाईनला जोडण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. यामुळे नदीचे प्रक्षण थांबून पाणी स्वच्छ होण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news