Shri Ghrishneshwar Mahadev Temple : 'बम बम बोले, हर हर महादेवा'चा शिवभक्तांचा जयघोष

शिवालय तीर्थकुंडातील जल घेऊन शिवभक्त जातेगाव मोठा महादेवकडे रवाना
Shri Ghrishneshwar Mahadev Temple
Shri Ghrishneshwar Mahadev Temple : 'बम बम बोले, हर हर महादेवा'चा शिवभक्तांचा जयघोष File Photo
Published on
Updated on

Shiva devotees chant 'Bam Bam Bole, Har Har Mahadeva'

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरात सोमवारच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी (दि.१०) दुपारपासून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. परंपरेनुसार याही वर्षी खेड्यापाड्यातून मोठा महादेव (जातेगाव) येथील पिनाकेश्वर महादेव मंदिराला शिवालय तीर्थकुंडापाणी घेऊन जलाभिषेक करण्यात येणार असल्याचे भाविकांनी सांगितले. मोठ्या महादेवाला शिवालय तीर्थकुंडातील पाण्याचा जलाभिषेक करून पाऊस पडण्यासाठी साखळी करणार असल्याचे अनेक भाविकांनी सांगितले.

Shri Ghrishneshwar Mahadev Temple
Kashi Vishweshwar Mahadev Temple : शेतातील जुने ज्योतीनगरचे श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जातेगाव (ता. नांदगाव) येथे वेरूळ येथील शिवालय तीर्थकुंडातून भोपळे वाल्यांनि तीर्थकुंडातील पाणी भोपळ्यात घेऊन अनवाणी पायाने हर हर महादेवाच्या गजरात रवाना झाले. भाविक मोठ्या संख्येने हातात काठी घेऊन वेरूळ पासून ६५ किलोमीटर असलेल्या मोठ्या महादेवाला जलाभिषेक करून पुन्हा वापस शिवालय तीर्थकुंडामध्ये स्नान करतात.

श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतल्यावर श्रावण महिन्यातील मोठ्या महादेवाची पायी यात्रा सफल होते अशी भाविकांची धारणा आहे. जीवनात येणाऱ्या अनेक अडचणी संकटे, नुकसान टळून जातात अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच पायी जाणाऱ्या भाविकांसाठी पूर्ण यात्रा मार्गावर चहा-पाणी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. वेरुळच्या शिवालय तीर्थकुंडावर काठी, रेबिन, भोपळे, चमकी यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

Shri Ghrishneshwar Mahadev Temple
Sillod Water Shortage : सिल्लोड तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट, अर्धा पावसाळा संपला तरी जलसाठे कोरडेठाक

लाखो भाविकांनी घेतले श्री भद्रा मारुतीचे दर्शन

लाखो भाविकांनी दोन तास रांगेत उभे राहून तिसऱ्या श्रावणी शनिवारी श्री भद्रा मारुतीचे घेतले दर्शन घेतले. शुक्रवारी मध्यरात्री पासुन भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. सकाळ पर्यंत लाखोंच्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले. श्री भद्रा मारूती देवस्थान भक्तजनांचे आशास्थान असल्याने तिसऱ्या श्रावणी शनिवार हजारोंच्या संख्येने भक्तजन दर्शनासाठी आले होते.

श्री भद्रा मारुती च्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठीसंस्थान च्या वतीने पाण्यासाठी, दर्शनासाठी, व येण्याऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मंदीर परीसरात कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली गेली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, कन्नड, सोयगाव, सिल्लोडसह नासिक जिल्ह्यातील कोपरगाव, सिन्नर, येवला, अहिल्यानगर, श्रीरामपूर व जळगाव जिल्हातील चालीसगाव, भडगाव, पाचोरा आदी जिल्ह्यातून भाविक आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news