Paithan Accident | अवैध वाळू वाहतुकीच्या हायवाने घेतला शिवसैनिकाचा बळी: संतप्त नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास घटना
Paithan  Shiv Sena Worker Death
Paithan Shiv Sena Worker DeathPudhari
Published on
Updated on

Paithan Shiv Sena Worker Death

पैठण : तालुक्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वाहतूक शाखेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनाने दिलेल्या धडकेत एका शिवसैनिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी काही काळ मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ही घटना पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि. १९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शिवाजी बापूराव पठाडे (रा. नारळा, ता. पैठण) हे आपल्या स्कुटीवरून घरी जात असताना छत्रपती संभाजीनगर मार्गावरून वेगाने येणाऱ्या हायवा वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की पठाडे यांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांच्या स्कुटीचेही मोठे नुकसान झाले.

Paithan  Shiv Sena Worker Death
Chhatrapati Sambhajinagar | जालना रोडवरील २५२ वृक्षांची होणार कत्तल

अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या पठाडे यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, अपघात घडवून चालक हायवा वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला होता. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी, जोपर्यंत संबंधित चालकाला अटक होत नाही आणि अवैध वाळू वाहतुकीला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली आणि काही काळ तणाव निर्माण झाला.

Paithan  Shiv Sena Worker Death
Chhatrapati sambhajinagar crime | हवाबाज गँगस्टरची 'हवा' गुल

नंतर पोलिसांनी संबंधित हायवा वाहन व चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती दिल्यानंतर, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारून अंत्यसंस्कार केले.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पुढील गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, तालुक्यात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू व मुरूम वाहतूक सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या बेकायदेशीर वाहतुकीमुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे सांगितले जात असून, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित यंत्रणांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने लक्ष घालावे, अशी मागणीही विविध स्तरांतून पुढे येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news