Chhatrapati Sambhajinagar Flyover : शेंद्रा ते वाळूज नव्हे ओएसिसपर्यंत अखंड उड्डाणपूल; सहाऐवजी ७ ठिकाणी आऊटलेट

मंत्री सावे यांची मंत्री भोसले यांच्याकडे मागणी
Chhatrapati Sambhajinagar Flyover
शेंद्रा ते वाळूज या अखंड उड्डाणपुलाच्या मार्गाची पाहणी करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले. सोबत ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, माजी मंत्री डॉ. भागवत कराड व अधिकारी.pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : शेंद्र एमआयडीसी ते वाळूज एमआयडीसीपर्यंत अखंड उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय राज्य व केंद्राने घेतला आहे. परंतु, हा अखंड फूल वालुजच्या पुढे ओअसिस चौकापर्यंत नेण्यात यावा, ज्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या कायमची सुटेल. त्यासोबतच सिडको चौकातही सातवा आऊटलेट द्यावा, अशी मागणी उड्डाणपूलाच्या आराखडयासह प्रत्यक्ष मार्गाच्या पाहणीवेळी ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली. त्यास तत्वतः मान्यताही देण्यात आली आहे.

यावेळी माजी मंत्री डॉ. भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, एमएमआयडीसीएलचे मुख्य मुख्य अभियंता विशाल जवंजाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एम. एस. भगत, कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण, एमएसआयडीसीएलचे कार्यकारी अभियंता सुर्यकांत गलांडे, वल्ड बैंक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता प्रिया पूजारी, कार्यकारी अभियंता स्मिता पवार, शैलेश सुर्यवंशी यांची उपस्थित होती.

Chhatrapati Sambhajinagar Flyover
Sambhajinagar Drug Bust : नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी (दि. २६) छत्रपती संभाजीनगर दौन्यात विविध विकासकामांची पाहणी केली. यात प्रामुख्याने शहराची लाईफलाईन असलेल्या जालना रोडवर अखंड उड्डाणपूल उभारुन लाईफलाईन आणखी वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री फड़णवीस यांनी घेतला आहे. त्या रस्त्याची देखील मंत्री भोसले यांनी पाहणी केली. त्यावेळी अधिकाचांनी सादर केलेल्या प्रकल्प आराखडयात मंत्री सावे यांनी काही सूचना मांडल्या.

हा उद्घाणपूल केवळ शेंद्रा ते वाळूज करण्याऐवजी पुढे वाळूज ते ओएसिस चौकापर्यंत नेण्यात यावा, ज्यामुळे ओएसिस चौकात निर्माण होणारी दररोजची वाहतुक कौडीतून वाहनधारकांची सुटका होईल. त्यासोबतच या उड्डाणपूलावर सध्या सहा ठिकाणी आऊटलेट दिले आहे. परंतु, प्रमुख ठिकाण म्हणजे सिडको चौक असून त्याठिकाणी देखील एक आआऊटलेट पाहिजे, त्यामुळे आणखी एका आऊटलेटचा समावेश केला आहे. आता दुरुस्तीसह हा नवा आराखडा लवकरच मंजूरीस्तव सादर होणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात शहराच्या अखंड उष्णपुलाचे काम सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

Chhatrapati Sambhajinagar Flyover
Nanded Crime | शेतकरी हत्या प्रकरण : ३ आरोपींना कोठडी तर आणखी एकजण ताब्यात

डिसेंबरपर्यंत सारथीचे काम पूर्ण करा

डॉ. हेडगेवार रुग्णालयाजवळील सारथी इमारतीच्या बांधकामाची मंत्री भोसले यांनी पाहणी केली. यात प्रशासकीय इमारत, मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह आणि अभ्यासिका अशा चार इमारतींचा समावेश आहे. मुलांच्या आणि मुलींच्या वसतिगृहांत प्रत्येकी ५२८. विद्याथ्यांच्या निवासाची व्यवस्था आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.

विविध कामांची पाहणी

कांचनवाडीतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या फेज-२ अंतर्गत प्रशासकीय इमारत, संधालय आणि व्याख्यानगृहांच्या बांधकामाचा आढावा घेतला. त्यासोबतच नेहरुनगर येथे उभारण्यात येत असलेली दहा मजाली न्यायमूर्तीच्या निवासस्थानाचे काम डिसेंबराकये पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच नगरनाका ते पडेगाव रस्त्याआड येणाऱ्या वृक्षांचे पुर्नलागवड करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news