Sambhajinagar Drug Bust : नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या

१६५ गोळ्या, मोबाईल आणि रोख रक्कम असा ८६ हजाराचा मुद्देमाल जप्त
Sambhajinagar Drug Bust
Sambhajinagar Drug Bustpudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : शहरातील तरुणाईला नशाखोरीच्या जाळ्यात ओढणाऱ्या अंमली औषधी गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन तस्करांना अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून १६५ गोळ्या, मोबाईल आणि रोख रक्कम असा ८६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी (दि.२४) जालना रोडकडून महेशनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बाफना ज्वेलर्सच्या मोकळ्या प्लॉटजवळ करण्यात आली.

अजय भाऊसाहेब गात (२७, रा. गल्ली नं. ३०, बायजीपुरा) आणि श्रीकांत रामेश्वर शेजुळ (२०, रा. हनुमान मंदिराजवळ, गल्ली नं. ३०, बायजीपुरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी पडेगाव येथील नयना शेख उर्फ बाजी हिच्याकडून गोळ्या आणल्याची माहिती दिल्याने तिलाही आरोपी करण्यात आले आहे.

Sambhajinagar Drug Bust
Nanded Ganja Seizure : नांदेडमध्ये सव्वादोन लाखांचा गांजा जप्त; दोघांना बेड्या

एनडीपीएस पथकाला दोन तरुण जालना रोडकडून महेशनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाफना ज्वेलर्सच्या मोकळ्या प्लॉटजवळ नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी थांबले असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने धाव घेऊन दोघांना पकडले. त्यांची झडती घेतली असता १६५ नशेच्या गोळ्या, मोबाईल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून दोघांनाही ताब्यात घेतले.

Sambhajinagar Drug Bust
Beed Drought : 'बैलजोडीला बाळसं राहणार नाही, आबाळ होईल'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news