Chhatrapati Sambhajinagar News : भूसंपादनाच्या दर निश्चितीनंतर ग्रीनफिल्ड वे साठी मोजणी करा

शेंद्रा-बिडकीन महामार्ग : शेतकऱ्यांच्या विरोधानंतर अधिकाऱ्यांनी काढली समजूत
Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar Greenfield Highwaypudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा-बिडकीन आणि ढोरेगाव या इंडस्ट्रीयल ग्रीनफिल्ड महामार्गाच्या कामाला शासनाने फास्टट्रॅकवर घेतले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने भूसंपादनापूर्वीच्या प्रक्रियेंतर्गत जमीन मोजणीला सुरुवात केली. परंतु, मोजणीपूर्वी दर निश्चित करा, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध दर्शविला आहे. मात्र, मोजणीनंतरच दर निश्चितीची प्रक्रिया होते, असे सांगून अधिकाऱ्यांनी प्रक्रियेची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिल्यानंतर विरोध मावळला.

शेंद्रा-बिडकीन ऑरिक डीएमआयसी आणि शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतून पुढे ढोरेगावमार्गे अहिल्यानगर, पुण्याकडे जाणाऱ्या नव्या ग्रीनफिल्ड महामार्गासाठी सध्या भूसंपादनाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. शासनाने या ग्रीनफिल्ड महामार्गाला फास्टट्रॅकवर घेतले आहे. त्यानुसार कामाला गती देण्यात आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar News
Sambhajinagar development : शहराला आयआयटी अन् मेट्रोची गरज; पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागारांसमोर मांडला रोडमॅप

ंशेंद्रा-बिडकीन ऑरिक डीएमआयसी आणि शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतून पुढे ढोरेगावमार्गे अहिल्यानगर, पुण्याकडे जाणाऱ्या नव्या ग्रीनफिल्ड महामार्गासाठी सध्या भूसंपादनाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. शासनाने या ग्रीनफिल्ड महामार्गाला फास्टट्रॅकवर घेतले आहे. त्यानुसार कामाला गती देण्यात आली आहे.

गेल्या आठवाड्यातच या ग्रीनफिल्डसाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यात महामार्गाच्या पुढील प्रक्रियेला तातडीने सुरुवात करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, या महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी जागेच्या दरावरून आता विरोध सुरू केला आहे. तीन आठवड्यांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात आमदार विलास भुमरे यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली.

या बैठकीत रस्त्याच्या नवीन अलाइन्मेंटला शेतकऱ्यांनी विरोध करीत बदल्याची मागणी केली. परतु, आता शासन अलाईन्मेंट बदलण्याच्या मनस्थितीत नाही, हे शेतकऱ्यांना कळाले आहे. त्यामुळे दर निश्चित करण्याची मागणी केली जात आहे. महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेपूर्वीच्या जमीन मोजणीला सुरुवात झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांच्या अखत्यारित असलेल्या जमिनीच्या मोजणीला गुरुवारपासून सुरुवात झाली. शुक्रवारी करमाडमधील गावाच्या मोजणीवेळी शेतकऱ्यांनी विरोध केला.

Chhatrapati Sambhajinagar News
Parbhani Crime : सोनखेड येथील ग्रामसभेत गोंधळ; महिला सरपंचाला जीवे मारण्याची धमकी

अगोदर दर निश्चिती करा, त्यानंतरच जमीन मोजणी करण्यात यावी, त्याशिवाय जमिनीची मोजणी करू देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. त्यावर अधिकाऱ्यांनी मोजणीच्या ठिकाणी धाव घेत शेतकऱ्यांची समजूत काढली. तसेच प्रक्रियेबाबत माहिती दिली. त्यानंतर विरोध मावळला.

एक गावाची मोजणी पूर्ण

या इंडस्ट्रीयल ग्रीनफिल्ड मार्गाच्या भूसंपादनपूर्वीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. उपविभागीय अधिकारी वेंकट राठोड यांच्या अखत्यारित येणाऱ्या करमाड परिसरातील गट नंबर १८०, १८२, १८३, १८४, १८५, १८७, १८८, १९१, १९२, १९३, १९४, २२२, २२३, २२४ या गटांचा समावेश आहे. करमाडच्या एका गावाची मोजणी पूर्ण झाली आहे

शेतकऱ्यांचे लक्ष दर निश्चितीकडे

शेंद्रा-बिडकीन आणि ढोरेगाव या इंडस्ट्रीयल ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादनला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीची प्रक्रिया सध्या सुरू असून शेतकऱ्यांचे लक्ष दर निश्चितीकडे लागले आहे. जास्त दर मिळावा, यासाठी प्रत्येकजण प्रयत्नात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news