Parbhani Crime : सोनखेड येथील ग्रामसभेत गोंधळ; महिला सरपंचाला जीवे मारण्याची धमकी

चुडावा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Parbhani Crime
पूर्णा : तालूक्यातील सोनखेड येथील ग्रामसभेत गणपत सूर्यवंशी व धनाजी सूर्यवंशी यांनी गोंधळ घालत महिला सरपंचाला जिवे मारण्याची धमकी दिली.pudhari photo
Published on
Updated on

पूर्णा : तालुक्यातील सोनखेड (मोठी पांढरी) गावात २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर सार्वजनिक जागेत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभा सुरू असताना गावातीलच आरोपी गणपत पि. गोविंद सूर्यवंशी व धनाजी पि. गोविंद सूर्यवंशी यांनी संगनमत करून ग्रामसभेत वाद व गोंधळ घातला. त्यानंतर ग्रामसभा बरखास्त करून अध्यक्षस्थानी असलेल्या महिला सरपंच मुक्ताबाई सोपानराव सूर्यवंशी यांच्या अंगावर धावून जात त्यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच त्यांना सार्वजनिक कर्तव्यापासून परावृत्त करून महिला सरपंचासह त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी सरपंच मुक्ताबाई सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून चुडावा पोलीस ठाण्यात संबंधित दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा रजि. नं. २२९/२०२६, कलम १३२, २९६, ३५१ (३), ३५२, ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह. कच्छवे करीत आहेत. दरम्यान, ग्रामसभेत गोंधळ व वाद घालून सभा उधळून लावणे, महिला सरपंचांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणे तसेच जीवे मारण्याची धमकी देत दादागिरीचे व असभ्य वर्तन केल्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Parbhani Crime
Manoj Jarange Patil hunger strike : जरांगे यांचे आजपासून अंतरवालीत उपोषण

महिला सरपंच विविध योजनांतर्गत विकासकामे करत असताना त्यांच्या विकासकामात अडथळा आणून दादागिरीयुक्त दडपशाहीचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. गावातील विकासाला जाणीवपूर्वक विरोध करून महिला सरपंचासह त्यांच्या कुटुंबीयांना सळो की पळो करून उबगून लावले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया आम जनतेतून व्यक्त होत आहे.

यापूर्वीदेखील विकासकामे न देखवणाऱ्यांनी महिला सरपंचांना त्रास दिल्याचे प्रकार घडले आहेत. त्यातच आता ग्रामसभेत गोंधळ घालून सभा उधळून लावल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, एकीकडे देशात महिला सक्षमीकरणाचे वारे वाहत असताना दुसरीकडे एका महिला सरपंचाला अशा प्रकारे मज्जाव केला जात असल्याने तालुका परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला.

Parbhani Crime
Manoj Jarange Patil hunger strike : जरांगे यांचे आजपासून अंतरवालीत उपोषण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news