Sambhajinagar Crime News : दहावी नापास तरीही बनल्या प्राचार्य

डी.एस.आर. कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या बडतर्फ प्राचार्या डॉ. नसीमविरुद्ध गुन्हा दाखल
Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime News : दहावी नापास तरीही बनल्या प्राचार्यFile Photo
Published on
Updated on

She became a principal despite failing 10th standard, crime registered

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बनावट शैक्षणिक कागदपत्रांवर नोकरी मिळवणे, शासकीय शिष्यवृत्तीतील निधीचा अपहार आणि संस्थेची बदनामी केल्याप्रकरणी सुफा एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी संचलित डी.एस.आर. कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या बडतर्फ प्राचार्या डॉ. नसीम एकबाल ममदानी (५१) हिच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sambhajinagar Crime News
Inspire Award exhibition : वैज्ञानिक व्हा ! विज्ञाननिष्ठा जपा !

या प्रकरणी संस्थेचे प्रभारी प्राचार्य डॉ. एजाज अली सय्यद अमजद अली (३९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी नसीम ममदानी या १० वी अनुत्तीर्ण असून, गुणपत्रिकेत फेरफार करून १२ वीमध्ये प्रवेश मिळवला. त्याच आधारावर त्यांनी पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी डी. एस. आर. कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून नियुक्ती मिळवली आणि पुढे प्राचार्या पदावर कार्यरत राहिली.

दरम्यान, आरोपीच्या भावानेच विद्यापीठाकडे लेखी तक्रार दाखल करून नसीम ममदानी एस.एस.सी.अनुत्तीर्ण असूनही प्राचार्या कशा? असा सवाल उपस्थित केला. विद्यापीठाने संस्थेला खुलासा मागवला. संस्थेच्या चौकशीत आरोपीने एस.एस.सी.ची मूळ गुणपत्रिका सादर करण्यास नकार दिला. आरोपीने विद्यापीठात मी निवड समितीत उपस्थित नव्हते असा खोटा अर्ज सादर करून संस्थेला व निवड समितीला बदनाम केले.

Sambhajinagar Crime News
Sambhajinagar News : हायड्रोलिक टेस्टिंगदरम्यान तुटला प्रेशर गेजचा पाईप

मात्र नोंदवहीत त्यांच्या सह्या स्पष्टपणे आहेत. तसेच, संस्थेवर दबाव आणण्यासाठी आरोपी आणि तिचे कुटुंबीय फेसबुकवरून चौकशी समिती सदस्य, संस्थेचे पदाधिकारी आणि विधिज्ञ यांची बदनामी करत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. संस्थेने दौलताबाद व सिटीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, तसेच पोलिस आयुक्तांकडेही निवेदन दिले. परंतु कारवाई न झाल्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार सिटी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास उपनिरीक्षक भागवत मुठाळ करीत आहेत.

चौकशी समितीकडून फौजदारी कारवाईची शिफारस

या प्रकरणी संस्थेने स्वतंत्र चौकशी समिती गठित केली. आरोपी समितीसमोर उपस्थित राहिली नाही. २७फेब्रुवारी २०२३ रोजी सादर केलेल्या अहवालानुसार, आरोपीने संस्थेला व शासनाला दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना संस्थेतून बडतर्फ करण्यात आले. समितीने फक्त बडतर्फी पुरेशी नसून, आरोपीविरुद्ध फौजदारी कारवाई व्हावी, अशी शिफारस केली.

शिष्यवृत्तीचे ३.४६ लाख हडपले

फिर्यादीनुसार, आरोपी प्राचार्या या नात्याने संस्थेच्या बँक खात्यातून रक्कम काढण्याचे अधिकार असताना त्यांनी त्या अधिकाराचा गैरवापर केला. २० ऑक्टोबर २०२१ रोजी शासकीय शिष्यवृत्ती खात्यातील ३ लाख ४६ हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news