Sambhajinagar News : हायड्रोलिक टेस्टिंगदरम्यान तुटला प्रेशर गेजचा पाईप

आकाशात उंच उडाले पाण्याचे फवारे : मुख्य पाईपलाईनची थांबवावी लागली चाचणी
Sambhajinagar News
Sambhajinagar News : हायड्रोलिक टेस्टिंगदरम्यान तुटला प्रेशर गेजचा पाईप File Photo
Published on
Updated on

Pressure gauge pipe broke during hydraulic testing

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराला वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी नक्षत्रवाडी एमबीआरपासून केटली गार्डन येथील जलकुंभापर्यंत टाकण्यात आलेल्या १४०० मिमी व्यासाच्या मुख्य पाईपलईनची हायड्रोलिक टेस्टिंग सुरू असताना बुधवारी (दि.१२) अचानक प्रेशर गेजचा पाईप तुटल्याने कामात अडथळा निर्माण झाला. पाण्याचे फवारे आकाशात उंच उडाले आणि चाचणी थांबवावी लागली. या घटनेमुळे आता चार दिवसांनी पुन्हा टेस्टिंग घेण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) च्या सूत्रांकडून मिळाली.

Sambhajinagar News
Ambadas Danve : मंत्री शिरसाटांच्या मुलीसाठी मतदार यादीत घोळ

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे नव्याने बसवलेल्या मुख्य पाईपलईनची हायड्रोलिक चाचणी घेण्याची तयारी मागील काही दिवसांपासून सुरू होती. पाईपलईनमध्ये पाणी भरून दाब (प्रेशर) वाढवण्याचे काम सुरू असताना, अचानक प्रेशर गेज जोडलेला पाईप तुटला. वाढत्या दाबामुळे पाण्याचा मारा झाल्याने कामगारांना तात्काळ मागे हटावे लागले आणि टेस्टिंग तातडीने थांबवण्यात आली. यानंतर तुटलेला पाईप दुरुस्त करण्यात आला असून, टँकरच्या माध्यमातून पुन्हा पाईपलईनमध्ये पाणी भरले जात आहे. संपूर्ण पाईपलईनमधील हवा आणि पाण्याचे प्रमाण संतुलित करून पुढील तीन ते चार दिवसांत पुन्हा टेस्टिंग घेण्यात येणार असल्याचे एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत डिसेंबरअखेरपर्यंत शहराला वाढीव २०० एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुळात हा प्रकल्प ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती; मात्र यंत्रणांना तो कालावधी पाळता आला नाही.

Sambhajinagar News
Sambhajinagar Political News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : बसपाचा स्वबळाचा नारा

त्यामुळे आता डिसेंबरअखेरचे नवीन लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि जीव्हीपीआर या कंत्राटदार संस्थेने यासाठी कंबर कसली आहे. मुख्य पाईपलईन, अंतर्गत नेटवर्क आणि जलकुंभ बांधकामांची गती वाढवण्यात आली आहे.

मोठे नुकसान नाही

पाईपलईनचे काम पूर्ण झाल्यानंतर हायड्रोलिक टेस्टिंग ही अत्यावश्यक प्रक्रिया आहे. दाव चाचणीदरम्यान गेजचा पाईप तुटला, मात्र मोठे नुकसान झालेले नाही. दुरुस्ती सुरू असून काही दिवसांत पुन्हा चाचणी होईल, असे एमजेपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अशी केली जाते हायड्रोलिक टेस्टिंग

पाईपलईनमधील पाण्याचा दाब तपासण्यासाठी हायड्रोलिक टेस्टिंग केली जाते. यात पाईपलईनचे दोन्ही टोक वेल्डिंग करून बंद केली जातात. एका बाजूने पाणी भरले जाते आणि ठराविक दाब निर्माण करण्यासाठी हवेचा प्रेशर दिला जातो. या प्रक्रियेदरम्यान प्रेशर गेज हे उपकरण अत्यंत महत्त्वाचे काम करते. गेजच्या डायलवर पाईपलाईनमधील दाबाचे मोजमाप दिसते. याच मोजमापावरून पाईपलईनची ताकद आणि लिकेज आहे की नाही, हे तपासले जाते. मात्र बुधवारी झालेल्या घटनेत प्रेशर गेजशी जोडलेला पाईप दाब सहन करू शकला नाही आणि तो तुटल्याने चाचणी थांबवावी लागली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news