Inspire Award exhibition : वैज्ञानिक व्हा ! विज्ञाननिष्ठा जपा !

जिल्हाधिकारी : जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचे उद्घाटन
Inspire Award exhibition
Inspire Award exhibition : वैज्ञानिक व्हा ! विज्ञाननिष्ठा जपा !File Photo
Published on
Updated on

District level Inspire Award exhibition inaugurated

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विद्याथ्यांनी शालेय जीवनापासून विज्ञान निष्ठा जपावी. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून जीवन सुखकर करावे, वैज्ञानिक बनावे, असा हितोपदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी इन्स्पायर अॅवार्ड प्रदर्शन सोहळ्यास सहभागी विद्यार्थ्यांना केला.

Inspire Award exhibition
Ambadas Danve : मंत्री शिरसाटांच्या मुलीसाठी मतदार यादीत घोळ

जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग आणि डॉ. ई. भा. पाठक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोनदिवसीय जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (दि. १३) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) अश्विनी लाठकर होत्या. उपशिक्षणाधिकारी सीमा मेहेत्रे, डॉ. इं. भा. पाठक महिला कला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनीता बाजपाई, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक दिलीप सिरसाट, समन्वयक डॉ. प्रभाकर गायकवाड आणि पर्यवेक्षिका प्रा. माधुरी भावसार उपस्थित होते.

Inspire Award exhibition
Sambhajinagar Political News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : बसपाचा स्वबळाचा नारा

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, अनेक महान वैज्ञानिकांच्या चरित्रामधून आपल्या लक्षात येते की, हे वैज्ञानिक विद्यार्थीदशेपासूनच प्रयोग करीत होते. सुरुवातीला त्यांचे प्रयोग उलटे-सुलटेही झाले, पण अथक प्रयत्नानंतर त्यांनी यश मिळविले. त्यांच्या या संशोधनामुळे आज आपले जीवन सुखकर झाले आहे. अशा प्रदर्शनातून सहभागी होणारे विद्यार्थी आज विविध संशोधन संस्थांमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news