Waluj News : अहिल्यानगर महामार्गावर सांडपाण्याचे तळे

अहिल्यानगर महामार्गाच्या साईड नालीमध्ये माती व कचरा जमा झाल्याने कामगार चौकाजवळ नालीचे सांडपाणी महामार्गावर जमा होऊन तळे साचले आहे.
Waluj News
अहिल्यानगर महामार्गावर सांडपाण्याचे तळेfile photo
Published on: 
Updated on: 

Sewage ponds on Ahilyanagar highway

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : अहिल्यानगर महामार्गाच्या साईड नालीमध्ये माती व कचरा जमा झाल्याने कामगार चौकाजवळ नालीचे सांडपाणी महामार्गावर जमा होऊन तळे साचले आहे. यामुळे याठिकाणी दररोज अपघाताच्या घटना घडत असून महामार्गावर साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.

Waluj News
Fraud Case : मुलीच्या शिक्षणासाठी उसने घेतलेले ७ लाख बुडवून डॉक्टरला गंडा

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील, पंढरपूरच्या काही भागांतील सांडपाणी तसेच जलवाहिनीमधून गळती होणारे पाणी अहिल्यानगर महामार्गालगत असलेल्या नालीमधून वाहून जात असते. मात्र अनेक दिवसांपासून या नालीची साफसफाई करण्यात आली नसल्याने ही नाली कामगार चौकाजवळ चोकअप झाल्यामुळे नालीतील सांडपाणी महामार्गवर जमा होत आहे.

शिवाय माती वाहून आल्याने महामार्गावर दलदल निर्माण होऊन वाहनधारकांना याठिकाणावरून वाहने चालविताना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत.

Waluj News
Panchayat Raj awards : पंचायतराज पुरस्कार सोहळ्यावर जि. प. सदस्यांचा बहिष्कार

दिशादर्शक कमानीला जाहिरातींचा विळखा

अहिल्यानगर महामार्गावरील गोलवाडी फाट्याजवळ असलेली दिशादर्शक कमान जाहिरातीच्या विळख्यात सापडली आहे. छत्रपती संभाजीनगराची ओळख पर्यटनाची राजधानी अशी असून रोज अनेक देशी-परदेशी पर्यटक शहरापासून जवळ असलेल्या दौलताबाद येथील देवगिरी किल्ला तसेच अजिंठा व वेरूळ लेणी बघण्यासाठी येत असतात. याशिवाय उद्योजकांची काही ना काही कामासाठी वाळूज औद्योगिक क्षेत्रात त्यांची ये-जा सुरू असते. पुणे, अहिल्यानगर आदी भागातून नव्याने शहरात येणाऱ्यांना शहराच्या कोणत्याही भागामध्ये जाणे सुलभ व्हावे यासाठी गोलवाडी फाटा येथे दिशादर्शक कमान उभारण्यात आली आहे. जाहिरात बाजी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.