Fraud Case : मुलीच्या शिक्षणासाठी उसने घेतलेले ७ लाख बुडवून डॉक्टरला गंडा

पिग्मी एजंटचा प्रताप; सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Fraud Case
Fraud Case : मुलीच्या शिक्षणासाठी उसने घेतलेले ७ लाख बुडवून डॉक्टरला गंडाfile photo
Published on: 
Updated on: 

Doctor swindled out of 7 lakh rupees lent for a girl's education

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुलीच्या उच्च शिक्षणाची निकड असल्याचे भासवून जुन्या ओळखीचा गैरफायदा घेत एका पिग्मी एजंटने शहरातील नामांकित जनरल फिजिशियनकडून ७ लाख रुपये उसने घेतले. मात्र, पैसे परत करण्याऐवजी चक्क दुसऱ्याच व्यक्तीच्या बँक खात्याचे धनादेश (चेक) स्वतःची सही करून देत डॉक्टरची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मेडिकव्हर हॉस्पिटल परिसरात घडला असून, न्यायालयाच्या आदेशानंतर सिडको पोलिस ठाण्यात संबंधित पिग्मी एजंटविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी मंगळवारी (दि.१७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fraud Case
Panchayat Raj awards : पंचायतराज पुरस्कार सोहळ्यावर जि. प. सदस्यांचा बहिष्कार

अंबादास गोपाळराव कुलकर्णी (रा. रो-हाऊस क्र. १३१, कासलीवाल मार्वल वेस्ट, हॉटेल निशांत पार्कसमोर, बीड बायपास) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी डॉ. आनंददीप ओमप्रकाश अग्रवाल (५३) यांच्या तक्रारीनुसार, ते डिसेंबर २०२० पासून सिडकोतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये जनरल फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत.

त्यापूर्वी २००५ पासून ते समर्थ नगर येथील साई हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरमध्ये कार्यरत होते. त्या काळात आरोपी अंबादास कुलकर्णी हा द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेचा पिग्मी योजना एजंट म्हणून साई हॉस्पिटलमधून दररोज पैसे जमा करण्यासाठी येत असल्याने डॉ अग्रवाल यांची त्याच्याशी ओळख झाली होती. जून २०२२ मध्ये कुलकर्णी याला डॉ. अग्रवाल यांनी त्यांच्या सहकारी डॉक्टर समक्ष ७ लाख रुपये दिले होते.

Fraud Case
Fire waste project : हर्सुलच्या कचरा प्रकल्पाला आग

दुसऱ्याच्याच खात्याचे धनादेश देऊन केला बनाव

वारंवार पाठपुरावा केल्यानंतर कुलकर्णीने सुरुवातीला लोकविकास नागरी सहकारी बँकेचा ७ लाख रुपयांचा एक धनादेश दिला. मात्र, त्यावर कुलकर्णीचे नाव छापलेले नसल्याने डॉक्टरांनी तो परत केला. त्यानंतर कुलकर्णीन द्वारकादास मंत्री नागरी बँक, बीड, बजरंग चौक शाखेचे ४ लाख आणि ३ लाख रुपयांचे दोन धनादेश दिले आणि मार्चअखेरची तारीख टाकून बँकेत जमा करण्यास सांगितले.

२६ मार्च २०२६ रोजी डॉ. अग्रवाल हे धनादेश वटवण्यासाठी द्वारकादास मंत्री बँकेत गेले असता, हे दोन्ही धनादेश कुलकर्णीच्या खात्याचे नसून इतरच व्यक्तीचे असल्याचे बँक मॅनेजरने सांगितले. कुलकर्णीन दुसऱ्या व्यक्तीच्या चेकवर स्वतःची स्वाक्षरी करून डॉक्टरची फसवणूक केल्याचे उघड झाले. डॉ. अग्रवाल यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तपास हवालदार भाऊसाहेब जगताप करत आहेत.

बँक बंद पडल्याचे कारण अन् एफडीची बतावणी

सहा महिन्यांची मुदत उलटल्यानंतर डॉ. अग्रवाल यांनी पैशांसाठी तगादा लावला. परंतु कुलकर्णीन टाळाटाळ सुरू केली. द्वारकादास मंत्री बँक बंद पडल्यामुळे आर्थिक अडचण असल्याचे सांगत, बँक सुरू झाल्यावर किंवा आपल्या नावावर असलेल्या दोन मुदत ठेवी मॅच्युअर झाल्यावर पैसे परत करतो, असे सांगून त्याने एफडीच्या झेरॉक्स प्रतीही डॉक्टरला पाठवल्या. मात्र, ठेवींची मुदत संपूनही त्याने पैसे दिले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.