Vaijapur Electricity Theft : वीज मीटरमध्ये फेरफार करून लाखोंची वीजचोरी

आठ जणांविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
Vaijapur Electricity Theft
वीज मीटरमध्ये फेरफार करून लाखोंची वीजचोरीpudhari photo
Published on
Updated on

गंगापूर/पैठण : वैजापूर शहरातील विविध भागांत वीज मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या सात जणांविरोधात गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या मोहिमेत एकूण ६ लाख ४३ हजार रुपयांहून अधिक रकमेची वीजचोरी उघडकीस आली आहे.

महावितरणने वैजापूर शहरात राबविलेल्या तपास मोहिमेदरम्यान खासगी व व्यावसायिक वापरासाठी देण्यात आलेल्या विद्युत मीटरमध्ये ३१ ऑक्टोबर २०२५ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत फेरफार करून वीजचोरी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात तब्बल ५ लाख २७ हजार ११५ रुपयांची, म्हणजेच २१ हजार ५७७ युनिट वीजचोरी झाल्याचे उघड झाले.

Vaijapur Electricity Theft
एलसीबीचा दणका: गॅस एजन्सी फोडणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या

याप्रकरणी महावितरणचे सहायक अभियंता योगेश लक्ष्मण खोमणे यांच्या फिर्यादीवरून फिरोज शेख मुस्तफा, झहीर अब्दुल मजीद शेख, विशाल रवींद्र गुळस्कर, महेश सुरेश टेके, अमीर खान तबरेज खान, नामदेव फुलचंद महाले व मनोज शिवलिंग राजपूत (सर्व रा. वैजापूर) यांच्याविरोधात गंगापूर पोलिसांत गुरुवारी (दि. २१) दुपारी २ वाजता वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. महावितरणकडून दंड भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती; मात्र संबंधितांनी दंड न भरल्याने ही कारवाई करण्यात आली.

महावितरणचे सहायक अभियंता योगेश खोमणे यांच्या फिर्यादीवरून रोहित पवार (रा. मोकळा प्लॉट, एमआयडीसी चितेगाव, ता. पैठण) याच्याविरोधात गंगापूर पोलिसांत गुरुवारी दुपारी १.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सफौ. अवधूत करीत आहेत.

Vaijapur Electricity Theft
Mumbai drug party | रेव्ह पार्टी कल्चरचा फैलाव!

चितेगावतही वीज चोरी

पैठण तालुक्यातील चितेगाव एमआयडीसी परिसरातही महावितरणने धडक तपासणी मोहीम राबवली. येथे रोहित कृष्ण पवार याच्या व्यावसायिक वीजजोडणीची १६ मार्च रोजी पाहणी केली असता रोहित्राच्या वीज वितरण पेटीत आकडा टाकून वीजचोरी सुरू असल्याचे आढळून आले. या प्रकरणात १ लाख १५ हजार ९७९ रुपये, म्हणजेच ३ हजार ४१३ युनिट वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news