एलसीबीचा दणका: गॅस एजन्सी फोडणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या

फैजपूर आणि वरणगावमधील सिलेंडर चोरीचे गुन्हे उघड; ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त
एलसीबीचा दणका: गॅस एजन्सी फोडणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या
Published on
Updated on

जळगाव : जिल्ह्यात गॅस एजन्सीची गोडाऊन फोडून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल घरफोड्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. फैजपूर आणि वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोठ्या घरफोड्यांचा छडा लावत पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ४ लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचे भरलेले आणि रिकामे सिलेंडर जप्त केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात गॅस एजन्सीची गोडाऊन टार्गेट केली जात होती. २५ एप्रिल रोजी फैजपूर येथील श्रीधर गॅस एजन्सीमधून ३ लाख ११ हजार रुपये किमतीचे १०० सिलेंडर चोरीला गेले होते. त्यापूर्वी २६ फेब्रुवारीला वरणगावमधील गॅस गोडाऊनमधून ५७ सिलेंडर लांबवण्यात आले होते. या वाढत्या चोऱ्यांमुळे गॅस वितरकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तपासाचे आदेश दिले होते. एलसीबीच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयास्पद वाहनांचा मागोवा घेतला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी तीन संशयित शेख बिलाल शेख नबी (वय ३२, रा. कासोदा, एरंडोल) वसीम खान शाबीर खान (वय ३९, रा. तांबापुरा, जळगाव) चेतन सुरेश काळे (वय ३८, रा. नशिराबाद, भुसावळ)ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.

यामध्ये जप्त केलेला मुद्देमाल :

  • ६२ भरलेले सिलेंडर (किंमत १,५५,०००/-)

  • ९५ रिकामे सिलेंडर (किंमत १,४२,५००/-)

  • सुझुकी बर्कमन मोपेड (MH 19 EU 8871)एकूण किंमत: ४,२७,५०० रुपये. मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर आणि केदार वारवोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पीएसआय सोपान गोरे, हेड कॉन्स्टेबल प्रीतम पाटील प्रेमचंद सपकाळे सलीम तडवी उमाकांत पाटील यशवंत टहाकडे कृष्णा देशमुख बबन पाटील सचिन घुगे तांत्रिक मध्ये गौरव पाटील मिलिंद जाधव यांनी ही कारवाई केली आरोपींना पुढील तपासासाठी फैजपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news