Helmet Mandatory : हेल्मेट सक्तीचा दुसरा दिवस अधिक कडक !

५ हजारांहून अधिक दुचाकीस्वारांना ५८ लाखांचा दंड : पोलिसांच्या कारवाईचा परिणाम
Helmet Mandatory
Helmet Mandatory : हेल्मेट सक्तीचा दुसरा दिवस अधिक कडक !file photo
Published on
Updated on

Second day of mandatory helmet rule sees stricter enforcement!

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या हेल्मेट सक्तीच्या मोहिमेचा दुसरा दिवस (बुधवार, दि. २ सप्टेंबर) अधिक कडक राहिला. वाहतूक शाखा आणि सर्व पोलिस ठाण्यांच्या संयुक्त पथकांनी शहरात विनाहेल्मेट फिरणाऱ्या तब्बल ५ हजार १७५ दुचाकी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

Helmet Mandatory
Kharif crops : ७२ हजार हेक्टरवरील खरीप संकटात

या कारवाईत एकाच दिवसात ५८ लाख ८९ हजार १५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पोलिसांच्या या सलग दुसऱ्या दिवसाच्या धडक कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये आता दुचाकीवर हेल्मेट परिधान करण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.

बुधवारी सकाळी ११ ते १ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत शहरात चौकाचौकांत पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. हर्सल टी पॉइंट, मुकुंदवाडी चौक, जळगाव टी, केंब्रिज चौक, हायकोर्ट सिग्नल, सेव्हन हिल, दर्गा चौक, आकाशवाणी चौक, अमरप्रीत चौक, क्रांती चौक, सेशन कोर्ट, महावीर चौक, रेल्वे स्टेशन चौक, कार्तिकी चौक, मिलकॉर्नर चौक, नगर नाका, ए.एस. क्लब चौक, ओअॅसिस चौक आणि कामगार चौक अशा विविध प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करून ही विशेष मोहीम राबवण्यात आली.

Helmet Mandatory
Ganesha idol workshop : इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा उत्साहात

या कारवाईत ५८ लाख ८९ हजार १५० रुपये दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी ४७ हजार ५०० रुपये दंड पोलिसांकडून जागीच वसूल करण्यात आला आहे. ही मोहीम पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त शशिकांत सातव, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. यामध्ये पोलिस निरीक्षक पवन चौधरी, रेखा लोंढे, नीतू तायडे, सहायक निरीक्षक रवी गच्चे, सचिन मिरधे तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या अधिपत्याखालील अंमलदारांनी सहभाग घेतला-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news